15 June 2024 3:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या सर्व महत्त्वाच्या पदांवरून हकालपट्टी | शिवसेनेशी संबंध संपला

Eknath Shinde

Eknath Shinde | शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय कारवाई करणार, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. अखेर उद्धव ठाकरे यांनी निर्णय घेत एकनाथ शिंदेवर मोठी कारवाई केली आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेनेच्या सर्व महत्त्वाच्या पदांवरून हकालपट्टी करण्यात आली आहे.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांचं नेतृत्व करणाऱ्या एकनाथ शिंदेंवर कारवाईचा बडगा उगारला आहे. उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची शिवसेनेतील सर्व पदावरून हकालपट्टी केली आहे. पक्षविरोधी कृत्यांमध्ये सहभागी झाल्याचा कारणावरून ही कारवाई करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे यांना सर्वपदावरून हटवण्यात आल्याचं एक पत्र समोर आलं आहे. ३० जून रोजीचं हे पत्र आहे. त्यावर सुरूवातीलाच एकनाथ शिंदे यांचं नाव असून, उद्धव ठाकरे यांची स्वाक्षरी आहे.

पक्षविरोधी कृत्यांमध्ये तुमचा सहभाग असल्याचं आढळून आलं आहे. त्याचबरोबर तुम्ही शिवसेनेचं सदस्यत्व सोडलेली आहे. त्यामुळे तुमच्यावर ही कारवाई करण्यात येत आहे. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून माझ्या अधिकारांचा वापर करत तुम्हाला पक्षाच्या सर्व पदावरून काढण्यात येत आहे, असं या पत्रात म्हटलेलं आहे.

संजय राऊतांकडून अधिकृत खुलासा :
‘एकनाथ शिंदे यांच्यावर पक्षाची शिस्तभंगाची कारवाई झाली आहे. शिवसेना पक्षप्रमुख यांच्या सहीने ही कारवाई झाली आहे. आता ते शिवसेनेचे नेते नाही. उद्धव ठाकरे यांनी आपल्या अधिकारानुसार कारवाई केली आहे, असं म्हणत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्या पत्राबद्दल स्पष्ट खुलासा केला आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन ईडीची चौकशी आणि राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी केल्याच्या पत्राबद्दलही खुलासा केला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Eknath Shinde sacks from all party posts of Shivsena check details 02 July 2022.

हॅशटॅग्स

#Eknath Shinde(96)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x