9 May 2025 9:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7/12 Utara | कौटुंबिक जमीनीच्या 7/12 वर तुमचं नाव आहे? वारसा हक्काने 7/12 वर नाव जोडण्यासाठी लागतात ही कागदपत्रं SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Cash Limit At Home | तुम्ही घरामध्ये किती कॅश ठेवू शकता; नियम लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस येईल Cheque Bounce Alert | चेकने पेमेंट करणाऱ्या 90% लोकांना माहित नाही, ही चुका करू नका, सर्वकाही गमावून बसाल EPFO Money Alert | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, तुमच्या खात्यात EPF चे 1,56,81,573 रुपये जमा होणार Horoscope Today | 09 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

सिरीयल बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेत उसळली दंगल; समाज माध्यमांवर बंदी

Facebook

कोलंबो : श्रीलंकेमध्ये २१ एप्रिलला चर्च आणि हॉटेलांबाहेर झालेल्या ८ साखळी बॉम्बस्फोटांचे पडसाद आता उमटू लागले आहेत. तेथील नेगोंबोमध्ये स्थानिक सिंहली आणि मुस्लिमांदरम्यान दंगल भडकली आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना अटक केली असून श्रीलंकन सैन्याचे प्रवक्ते ब्रिगेडियर सुमित अटापट्टू यांनी सांगितले की, परिस्थिती सध्या नियंत्रणात आणण्यासाठी कर्फ्यु लावण्यात आला आहे. काल सदर घटना घडली. अफवांना रोखण्यासाठी समाज माध्यमांवर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.

श्रीलंकेमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये नेगोंबोतील एका चर्चचाही समावेश होता. परंतु, मागील १५ दिवसांमध्ये दोन समुदायांमध्ये झालेला हा पहिला प्रकार होता. रविवारी अधिकारी शहरातील शाळा पुन्हा सुरु करण्याच्या तयारीत असताना दंगल उसळली. समाजकंटकांनी मोटारसायकल, कारच्या काचा फोडल्या. या भागावर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकारने विशेष सुरक्षा दलाला पाचारण केले असून पोलीस तपास करत आहेत.

श्रीलंकेमध्ये सरकारने आपत्कालीन आणीबाणी लागू केली होती. यावेळी सुमारे १०,००० सैनिक दहशतवादी ठिकाणांवर छापेमारी करत आहेत. आतापर्यंत १०० हून अधिक लोकांना ताब्यात घेण्यात आले आहे. यामध्ये पाकिस्तानी नागरिकांचा एक चमूही आहे. सुरक्षा दलांना तेथे कारवाई करण्यासाठी पूर्ण सूट देण्यात आली आहे. मागील वर्षी देखील श्रीलंकेमध्ये बौद्ध सिंहला आणि मुस्लिमांमध्ये दंगल उसळली होती. मुस्लिम संस्था बौद्धांचे जबरदस्ती धर्मपरिवर्तन करत असल्याचा आरोप करण्यात आला होता. तेव्हाही सरकारला कर्फ्यू लावाला लागला होता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या