4 May 2025 6:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HDFC Mutual Fund | पगारदारांनो! बिनधास्त गुंतवणूक करा, 12 पटीने गुंतवणुकीचा पैसा वाढेल, संपत्तीत मोठी वाढ होईल Bonus Share News | फ्री बोनस शेअर्सचा पाऊस पडणार, ही कंपनी फ्री बोनस शेअर्स देणार, संधी सोडू नका Horoscope Today | 05 मे 2025, तुमच्यासाठी सोमवारचा दिवस कसा असेल? तुमचे सोमवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार सोमवार 05 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | 764 टक्के परतावा देणारा शेअर खरेदी करा, झटपट 25 टक्के कमाईची संधी - NSE: REC TCS Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करणार, केव्हाही बिनधास्त करावा असा शेअर - NSE: TCS Infosys Share Price | आयटी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा जाणून घ्या - NSE: INFY
x

VIDEO: महाराष्ट्राला भिकारी बनवण्याचे भाष्य करणा-या तानाजी सावंतांना उद्धव ठाकरेंकडून मंत्रिपद

Shivsena, Udhav Thackeray, MLA Tanaji Sawant

मुंबई : महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचा रविवारी विस्तार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या मंत्रिमंडळात १३ युतीच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र शिवसेनेचे विधानपरिषदेचे आमदार तानाजी सावंत यांना मिळालेल्या मंत्रीपदावरून शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. महाराष्ट्राला भिकारी बनवण्याची भाषा करणारा व्यक्ती मंत्री होत असेल तर यापेक्षा राज्याचे दुर्दैव काय असेल? असे निलेश राणे म्हणाले.

रविवारी मंत्रिमंडळ विस्तारात शिवसनेच्या २ आमदारांना मंत्रीपद देण्यात आले आहे. त्यात, विधान परिषदेचे आमदार तानाजी सावंत यांचा समावेश आहे. सावंत यांना मिळालेल्या मंत्रीपदावरून निलेश राणेंनी शिवसेनचा समाचार घेतला आहे. महाराष्ट्राला भिकारी बनवण्याचे वक्तव्य करणा-या व्यक्तीला जर मंत्रिमंडळात संधी मिळत असेल तर, महाराष्ट्राचे यापेक्षा मोठ दुर्दैव कोणते अशी चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे.

२०१७ मध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतील प्रचारादरम्यान, ‘सव्वाशे-दीडशे कोटींचा कारखाना खरेदी करायला मला फारसे काही लागत नाही. काही लोकांचा गैरसमज झाला असेल की तानाजी सावंत भिकारी-बिकारी झालाय. पण तसे काही नाही. हा गैरसमज काढून टाका. मी महाराष्ट्राला भिकारी बनवेन, पण तानाजी सावंत कधीही भिकारी बनणार नाही,’ असे सावंत म्हणत असल्याचे व्हिडिओ समोर आले होते. त्यानंतर त्यांचावर मोठ्याप्रमाणात टीका सुद्धा झाली होती. निलेश राणेंनी आपल्या ट्विटर अकाऊन्ट वरून सावंत यांच्या त्या वक्तव्याचा व्हिडिओ सुद्धा शेयर केला आहे.

काय आहे नेमका तो व्हिडिओ?

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Shivsena(1170)#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या