5 May 2025 5:13 PM
अँप डाउनलोड

या गोष्टींचा उल्लेख इन्कम टॅक्स रिटर्न'मध्ये केला नाही तर दंड भरावा लागणार.

ITR, Income tax Return, Income tax, Indian tax, GST, Penalty

नवी दिल्ली : इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी ३१ ऑगस्ट हि शेवटची तारीख आहे. या महिन्यात तो काहीही करून तो भरावाच लागेल. पण त्या घाईत जर काही गोष्टींचा उल्लेख करणे राहून गेले तर तुम्ही गोत्यात येऊ शकता. हल्ली अनेक जण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करत असतात. एका म्युच्युअल फंडातून दुसरीकडे जाताना म्युच्युअल फंडातून जे पैसे मिळतात ते दाखवणं राहून जात याचा उल्लेख कर्ण आवश्यक आहे. अन्यथा आयकर विभागाकडून तुम्हाला दंड आकारला जाऊ शकतो.

इन्कम टॅक्स रिटर्न फाईल करताना सेविंग अकाउंट आणि एफडीमधून मिळणार व्याजही दाखवावं लागत. तसेच छोट्या मुलांच्या नवे केलेली गुंतवणूक एका वर्षात १५०० रुपयांपर्यंत करमुक्त आहे. पण जर ती या रकमेच्या वर जात असेल तर ती सुद्धा इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये दाखवावी लागणार आहे. आयकर विभागाच्या नियमानुसार तुमच्या मालकीचे एक घर हे करमुक्त आहे. परंतु जर तुम्हाला दुसऱ्या घरातून उत्पन्न मिळत असेल तर याचाही उल्ल्लेख तुम्हाला करावा लागणार आहे. करदाता पहिल्यांदा भरलेला रिटर्न किंवा फॉर्म आयकर विभागाच्या वेबसाईट वरून डाउनलोड करू शकतात.

इन्कम टॅक्स रिटर्न भरत्यावेळी जर तो फॉर्म वेरीफाय केलेला नसेल तर आयकर नियमाप्रमाणे तो वैध मानला जाणार नाही. यासाठी तुमचा मोबाईल नंबर आधारकार्डशी जोडलेला असला पाहिजे. तुमच्या मोबाईल वर येणार ओटीपी आयकर विभागाच्या वेबसाईटवर टाकला कि रिटर्न व्हेरिफाय होईल. या सगळ्या गोष्टींची दक्षता ITR भरताना घेतली नाही तर तुम्ही गोत्यात येऊ शकता.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#india(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या