5 May 2025 1:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rattan Power Share Price | 10 रुपयांच्या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले; अपसाईड टार्गेट - NSE: RTNPOWER AWL Share Price | जबरदस्त अपसाईड तेजीचे संकेत; अदानी विल्मर शेअरला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: AWL Suzlon Share Price | टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, स्वस्तात खरेदी करून ठेवा, पैसा वाढवा - NSE: SUZLON Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये आज 2.51% तेजी; जोरदार खरेदी, नेमकं कारण काय? - NSE: TATATECH Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार; शॉर्ट टर्ममध्ये होईल मजबूत कमाई - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
x

सांगली: पूरग्रस्त दुर्गम भागात मनसेकडून औषधांचा पुरवठा

Sangali Flood, Kolhapur Flood, Flood, MNS, Maharashtra Navnirman Sena, Raj Thackeray

मुंबई : निसर्गही किती विचित्र आहे, एका बाजूला मराठवाड्यात सुका दुष्काळ पडला असतानाच कोल्हापूर, सांगली, सातारा, नाशिक व कोकणाला निर्दयीपणाने पावसाने झोडपून काढले. इतके की, अनेक वर्षांनी महापूर आला. भयावह पूरसदृश परिस्थिती महाराष्ट्रात १ ऑगस्टपासून निर्माण व्हायला सुरुवात झाली, पण इतकी भयानक परिस्थिती निर्माण होईल, असं कुणाला स्वप्नातही वाटलं नव्हतं. शहरांना जोडणारे अनेक महामार्ग तसेच गावाकडे जाणारे छोटेछोटे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले, त्यामुळे दररोज या रस्त्यावर धावणारी लोकवाहिनीही ठप्प झाली.

राज्यात आलेल्या पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदतीचा ओघ कोल्हापूर, सांगली भागात सुरू आहे. अशा वेळी जिल्ह्यातील कानाकोपऱ्यापर्यंतच्या लोकांना मदत मिळावी यासाठी राजकीय पक्षदेखील प्रयत्नशील आहेत. मनसेनेही पूरग्रस्तांसाठी मदतीचा हात पुढे केला असून कोणीही न पोचलेल्या अशा सांगली जिल्ह्यातील शिये गाव, नागदेववाडी, माळवाडी, आंबेवाडी, चिखली, जयसिंगपूर येथील शिरोळ, नृहसिंगवाडी येथील गावात मनसेने मदत पोहोचवली आहे. तेथील ग्रामस्थांची चौकशी करत मनसेतर्फे सहाय्य करण्यात आले असून सांगली येथील औषधाच्या मागणीप्रमाणे त्यांना पुरवठा करण्यात आला आहे.

साधारण ५००० लीटर पाणी, ५००० फेस मास्क, ३५०० ORS रेडीमिक्स ड्रिंक, ५००० सेनेटरी नॅपकिन्स, ५०० बेबी डायपर पॅंन्टस, बॅबी फूड(मिल्क पावडर,सेरेलॅक इत्यादी), ५००० हजार व्यक्तिंना उपयोगी पडतील इतके अँटीबायोटिक औषधे, ओआरएस आणि बालरूग्णांसाठी पॅरासिटेमॉल सिरप, पोटभर मिळेल त्यावर काही दिवस पुरेल इतकी रसद आणि इतर जीवनावश्यक वस्तू या ग्रामस्थांना मनसेकडून पुरवण्यात आल्या आहे.

दरम्यान, मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, “महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या पश्चिम उपनगरातील पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी स्वखर्चाने पूरग्रस्त महिलांसाठी आवश्यक वस्तू विकत घेतल्या आहेत. यामध्ये साड्या, गाऊन, पेटिकोट, अंतर्वस्त्रे आणि सॅनिटरी नॅपकिन्स यांचा समावेश आहे”. लोकांकडून मदत घेतली जात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

“पूरग्रस्त भागातील महिलांना मासिक पाळीच्या दिवसांसाठी सॅनिटरी नॅपकिन उपलब्ध होत नसल्याचं समाजमाध्यमांतून अनेकांनी सांगितलं आहे. म्हणूनच आम्ही पूरग्रस्त गावांमध्ये सॅनिटरी नॅपकिनसुद्धा पाठवत आहोत. नागरिकांनीही सॅनिटरी नॅपकिनची पाकिटं आमच्यापर्यंत पोहोचवावीत”, असं आवाहन शालिनी ठाकरे यांनी केलं आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Raj Thackeray(55)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या