5 May 2025 5:06 PM
अँप डाउनलोड

पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेण्यास केव्हाही तयार: लष्करप्रमुख

Jammu Kashmir, JK, Article 370, Indian Army, Pakistan Army, Army Chief Bipin Rawat

अमेठी: काश्मीरमधील कलम ३७० हटवल्यानंतर मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांनी पाकव्याप्त काश्मीर मिळवण्याबाबत पाकिस्तानला अनेकदा इशारा दिला आहे. मंत्र्यांच्या या विधानावर लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, पीओकेबाबत सरकारने निर्णय घ्यावा आपले सैन्य प्रत्येक गोष्टीला तोंड द्यायला तयार आहे.

रावत म्हणाले, पीओकेसंदर्भात सरकारनं केलेल्या विधानामुळे आनंद झाला. परंतु याचा निर्णय सरकारनं घ्यायचा आहे. आम्ही आदेशावर काम करतो. तत्पूर्वी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, पीओकेसंदर्भात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना इशारा दिला आहे. पाकव्याप्त काश्मीरबाबत आता पाकिस्तानशी कोणतीही चर्चा होणार नाही. 6 ऑगस्ट रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 370वरच्या चर्चेदरम्यान संसदेत सांगितलं होतं की, आम्ही जीव देऊ पण पाकव्याप्त काश्मीर परत मिळवूच.

पाकव्याप्त काश्मीरबाबत केंद्र सरकारला निर्णय घ्यायचा आहे आणि भारतीय लष्कर कोणत्याही स्थितीसाठी तयार आहे, असेही रावत पुढे म्हणाले. जम्मू आणि काश्मीरमधून ३७० कलम हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाबाबत रावत यांनी स्वागत केले. रावत पुढे म्हणाले की, ‘काश्मीरचे लोक हे आपल्याच देशाचे लोक आहेत. ते आमचेच लोक आहेत. काश्मीरच्या लोकांना शांततेचे वातावरण देण्यासाठी भारतीय सुरक्षा दलांना संधी दिली गेली पाहिजे. काश्मीरच्या लोकांनी ३० वर्षे दहशतवादाला तोंड दिले आहे. आता त्यांना शांतीसाठीही वेळ द्यायला हवी.’

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Indian Army(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या