मुख्यमंत्री काय उपमुख्यमंत्रीही आम्हीच ठरवणार: अमित शाह

मुंबई: महाराष्ट्रात भारतीय जनता पक्ष-शिवसेना युतीला बहुमत मिळेल यात शंका नाही. पण भारतीय जनता पक्षाला स्वबळावरसुद्धा बहुमत मिळेल, असा दावा अमित शहा यांनी केला आहे. महाराष्ट्र आणि हरियाणा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एका खाजगी टीव्ही वृत्त वहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की मुख्यमंत्री हा भारतीय जनता पक्षाचाच असेल.
महाराष्ट्रात सेनेबरोबर युती असली तरी मुख्यमंत्रिपद आमचंच असेल, असंही शहा यांनी स्पष्ट केलं. उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय मात्र त्यांनी राज्याच्या नेत्यांवर सोपवला. देवेंद्र फडणवीस यांची टीम उपमुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. देवेंद्र फडणवीसांवर एवढी मोठी जबाबदारी टाकताना त्यांनी पुढचा मुख्यमंत्री कोण याचेही संकेत दिले. आमचं ठरलंय, असा दावा करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांचं नेमकं काय ठरलं होतं, हे आता स्पष्ट होत आहे.
“युतीमध्ये अनेकदा कार्यकर्त्यांचा दबाव असतो. तर अनेकदा पक्षांना आपला विस्तार करायचा असतो. या गोष्टी अजिबात चुकीच्या नाहीत. लोकसभा आणि विधानसभेत शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्र लढले होते आणि विजयी झाले होते. विधानसभेतही आम्ही एकत्र लढत आहोत आणि आम्ही नक्कीच विजयी होऊ,” असं शाह यावेळी युतीबद्दल बोलताना म्हणाले.
शिवसेनेनेही राज्यात मुख्यमंत्रिपदाचा दावा केला आहे. यावर बोलताना अमित शाह म्हणाले, “या वक्तव्यामुळे युतीला कोणताही धोका आहे असं मी मानत नाही. नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस हेच भाजपाकडून मुख्यमंत्रिपदी विराजमान होतील,” ही बाब स्पष्ट आहे, असंही त्यांनी नमूद केलं.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Suzlon Share Price | 'बाय' रेटिंग, 41 टक्के परतावा मिळेल, कमाईची अशी सुवर्ण संधी सोडू नका - NSE: SUZLON
-
Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर खरेदी करा, 24% परतावा मिळेल, पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATASTEEL
-
BEL Share Price | बिनधास्त खरेदी करावा असा शेअर, कंपनी फंडामेंटल्स मजबूत, ऑर्डरबुक सुद्धा मजबूत - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN
-
Yes Bank Share Price | या बँक शेअर्सची खरेदी वाढतेय; तज्ज्ञांनी कोणते संकेत दिले जाणून घ्या - NSE: YESBANK
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IREDA Share Price | 163 रुपयांचा शेअर देईल 21 टक्के परतावा, यापूर्वी दिला मल्टिबॅगर परतावा - NSE: IREDA
-
HAL Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश; मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्सची जोरदार खरेदी, अपसाईड टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAMOTORS