12 May 2025 4:28 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

RBI'ने DHFL विरुद्ध दिवाळखोरीची प्रक्रिया सुरु केली; गुंतवणूकदारांचे ६,००० कोटी धोक्यात?

RBI, DHFL, insolvency process

नवी दिल्ली: डीएचएफएलमध्ये (Dewan Housing Finance Corporation Limited) मुदत ठेवींच्या माध्यमातून गुंतवणूक करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणीत भर पडली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (Reserve Bank of India) या खासगी गृहकर्ज संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करून तिच्याविरोधात दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने या गुंतवणूकदारांचे ६ हजार कोटी रुपये कधी व कसे परत मिळणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.

रिझव्‍‌र्ह बँकेने बुधवारी सायंकाळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, कंपनीच्या कारभारासंबंधी चिंता आणि अनेकांची देणी थकविणे आणि दायीत्वाच्या पूर्ततेतील कसूर लक्षात घेऊन डीएचएफएलचा (DHFL) कारभार प्रशासकाकडे सोपवत असल्याचे स्पष्ट केले. इंडियन ओव्हरसीज बँकेचे माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आर. सुब्रमणियन यांची डीएचएफएलचे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

बॅंकेकडून घेतलेली ३१,००० कोटींची कर्जे शेल कंपन्यांमध्ये (Fake Companies) गुंतवल्याचा आरोप झाल्यानंतर “डीएचएफएल’ गोत्यात आली होती. रोकड टंचाईमुळे म्युच्युअल फंड कंपन्या, बॅंका, बॉंडधारक आणि इतर धनकोंची कर्जांची परतफेड करण्यास कंपनीला अपशय येत होते. दरम्यान, “डीएचएफएल’च्या संचालक मंडळाने खासगी संस्थांच्या माध्यमातून कंपनीचे अंतर्गत लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिले. त्याशिवाय कर्जाचे इक्विटीमध्ये रूपांतर करून १५,००० कोटी फेडण्याचा प्रस्ताव कंपनीने सादर केला होता.

दरम्यान, “डीएचएफएल’चे मुख्य प्रवर्तक असलेल्या वाधवा कुटुंबियांच्या अडचणी वाढण्याची शक्‍यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. वाधवा कुटुंबियांची “डीएचएफएल’मध्ये ३९ टक्के मालकी आहे. यापूर्वीच वाधवा कुटुंबियांविरोधात कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक कपिल वाधवा तसेच धीरज वाधवा यांची सक्तसवुली संचालनालयाने (ईडी) चौकशी केली होती.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Reserve Bank of India(38)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या