सैन्यदलावर सायबर हल्ला; जवानांना मोठ्याप्रमाणावर हायपरलिंकसोबत फिशिंग मेल

नवी दिल्ली: पाकिस्तान-चीनने भारतीय सैन्यदलांना इतर कुरापती करून त्रास देण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून थेट बी भारतीय सैन्यावर सायबर हल्ला झाल्याचं वृत्त आहे आणि भारतीय सैन्यदलाचे जवान यावेळी केंद्रस्थानी असल्याचं वृत्त आहे. कारण भारताच्या सैन्यदलावर शुक्रवारी रात्री उशिरा हॅकर्सनी मोठा सायबर हल्ला केला असून लष्कराने देखील सतर्कतेचा इशारा म्हणौन आपत्कालीन स्थिती घोषित करत जवानांनी मेल उघडताना, त्यावर नोटीस असे शिर्षक असल्यास ते अजिबात उघडू नयेत असे सक्तीचे आदेश दिले आहेत.
विशेष म्हणजे हा अलर्ट भारताच्या तिन्ही सैन्यदलांना देण्यात आला असून एचएनक्यू नोटिस फाइल.एक्सएलएस या हायपरलिंकसोबत बल्क फिशिंग मेल सैन्य दलातील जवानांना धाडण्यात येत आहेत. सदर मेल ‘[email protected]’ या ईमेल आयडीवरून पाठविण्यात येत आहेत, असे या प्रसिद्ध करण्यात आलेल्या सूचनेमध्ये नमूद करण्यात आले आहे. खाजगी इनबॉक्समध्ये हा मेल आल्यास सुरक्षेचा उपाय म्हणून तो उघडून नये. अशा प्रकारच्या मेलपासून सावध रहा आणि त्याची तक्रार करा तसेच तो मेल डिलीट करावा, असे या सूचनेमध्ये कळविण्यात आलं आहे.
भारत सरकार देखील भारतीय लष्करासाठी सायबर सेक्युरिटी टीम स्थापन करण्याची योजना आखात आहे. त्याला प्रमुख कारण म्हणजे पाकिस्तान आणि चीन हे दोन देख सध्या भारताच्या सैन्याविरुद्ध सायबर कुरापती करण्याच्या योजना आखून थेट भारतीय जवानांवर हनीट्रॅप लावून, महत्वाची माहिती मिळविण्याचे मार्ग अवलंबत असल्याचं यावेळी देखील अनेकदा निदर्शनास आलं आहे.
दरम्यान या सायबर हल्ल्यामागे नवीन ट्रेंड दिसत आहे. पाकिस्तानी गुप्तहेर भारतीय सैन्याच्या जवानांना त्यांच्या जाळ्यामध्ये ओढण्यासाठी दुसऱ्या देशांचा वापर करत आहेत. अनेक प्रकरणांत हे गुप्तहेर दुसऱ्या देशांचे सुरक्षा अधिकारी असल्याचे सांगून भारतीय सेनेच्या तंत्रज्ञान प्रणालीमध्ये घुसलेले आहेत, असेही एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
Major Cyber Attack over Indian Army But Suspected Be From Pakistan and china
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN