4 May 2025 2:32 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Share Price | तुमच्याकडे आहे का हा स्वस्त शेअर? गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, डाऊनसाइड टार्गेट - NSE: IRB Vodafone Idea Share Price | धमाल होणार, पेनी स्टॉक प्राईसवर होणार असा सकारात्मक परिणाम - NSE: IDEA IREDA Share Price | फक्त विचार करू नका, फायद्याचे निर्णय घ्या, हा शेअर ठरू शकतो फायद्याची गुंतवणूक - NSE: IREDA JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
x

त्यावेळी बाजूला गर्दी असल्याने मला हात उचलता आला नाही: मंत्री नवाब मलिक

Minister Nawab Malik

मुंबई: आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावर २ वर्षापूर्वी गेलो होतो, त्यावेळचा हा व्हिडिओ आहे, मात्र भाजपच्या ग्रुपमधून हा व्हिडिओ व्हायरल करुन माझी बदनामी करण्यात येत आहे असा आरोप अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. मलिकांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट पसरली होती.

नुकत्याच पार पडलेल्या शिवजयंतीला शिवनेरीवर सरकारच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी राज्यातील अनेक नेत्यांनी गडकिल्ल्यांवर हजेरी लावली होती. त्यापैकी रायगड किल्ल्यावरील दोन वर्षा पूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक , सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, आमदार अवधुत तटकरे, विद्या चव्हाण आणि माजी मंत्री फौजिया खानही उपस्थित आहेत. यामध्ये धनंजय मुंडे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जयघोष करत असताना यात नवाब मलिक मात्र गप्प बसल्याचं दिसत आहे. अजित पवारांसह अन्य जण शिवरायांच्या नावाने जय म्हणताना दिसत आहे. त्यामुळे शिवप्रेमी, भाजप आणि मनसेने या व्हिडिओ पोस्ट करुन नवाब मलिक आणि राष्टवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

याबाबत नवाब मलिक म्हणाले की, 2 वर्षापूर्वीचा तो व्हिडिओ आहे, भाजपकडून हा व्हिडिओ व्हायरल करुन माझी बदनामी करण्याचा प्रयत्न आहे, भाजपाला माझ्यापासून एवढी भीती का वाटते? आम्ही रायगड किल्ल्यावर गेलो होतो, तेव्हा सगळे नेते होते, तेव्हा धनंजय मुंडे यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा देण्यास सुरुवात केली. त्यावेळी गर्दी असल्याने मला हात उचलता आला नाही, पण मी तोंडाने जय बोललो असं नवाब मलिकांनी स्पष्ट केले आहे.

याबाबत मनसेचे अमेय खोपकर यांनी ट्विट केलं आहे की, आमचे असंख्य मुस्लीम बांधव आहेत, ज्यांच्यासमोर कुणी छत्रपती शिवाजी महाराज की, असं ओरडलं तरी ते आनंदाने जय अशी गर्जना करतात. मग या नवाब मलिकांना इतकी मग्रुरी का? महाराजांचा जयजयकार करण्यात कमीपणा वाटतो का? असा सवाल उपस्थित करण्यात केला आहे. तसेच अशा प्रवृत्तीच्या माणसाने राष्ट्रवादीच्या मुंबई अध्यक्षपदावर राहावं हे तुम्हाला पटतं का? या पक्षाचे अध्यक्ष आहेत ज्यांना त्यांचे समर्थक डायरेक्ट ‘जाणता राजा’ संबोधतात, त्या शरद पवारांना तरी असा माणूस कसा चालतो? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसला विचारण्यात आला आहे. अद्याप या प्रकरणावर राष्ट्रवादीकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही.

 

Web Title: Story I was unable to give slogans because to much crowed was present there says Minister Nawab Malik after viral video allegation.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#NCP(372)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या