3 May 2025 2:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

नोकियाच्या तामिळनाडूतील प्लान्टमध्ये ४२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण...प्लान्ट बंद

Covid 19, Nokia Sriperumbudur factory in Tamil Nadu

चेन्नई, २७ मे: मोबाईल बनवणाऱ्या प्रसिद्ध नोकिया कंपनीच्या तामिळनाडूमधील श्रीपेरंबुदूर येथील मॅन्युफॅक्चरिंग प्लान्टमध्ये ४२ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या या कंपनीचा प्लान्ट बंद ठेवण्यात आला आहे. नोकिया कंपनीने गेल्या आठवड्यात तामिळनाडूच्या श्रीपेरंबुदूर येथील प्लान्ट बंद करण्याचा निर्णय घेतला होता. कंपनीत काम करणारे ४२ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आज कंपनीने प्लान्ट बंद असल्याचे सांगितले.

लॉकडाऊनमध्येही परवानगी मिळाल्यानंतर नोकियानेही आपल्या तामिळनाडू येथील प्लान्टमध्ये पुन्हा एकदा कामाची सुरुवात केली होती. यापूर्वी उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडा येथील ओप्पो मोबाईल फोन कंपनीच्या फॅक्टरीमध्येही ९ कर्मचारी कोरोना संक्रमित आढळले होते. त्यानंतर ओप्पोनेही ही फॅक्टरी पुढच्या आदेशापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जाहीर केला.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी हरयाणातील गुडगाव स्थित मारुती सुझुकीच्या प्लांटमध्ये एका कर्मचाऱ्याचा कोरोना चाचणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने कंपनी व्यवस्थापनाची झोप उडाली होती. त्यामुळे कंपनीतील हजर राहणाऱ्या कामगारांमध्ये भीतीच वातावरण असल्याचं म्हटलं गेलं. मात्र माध्यमांनी विचारणा केल्यावर कंपनीच्या प्रवक्त्यांनी वृत्त खरं असल्याचं मान्य केलं होतं. पीटीआयने त्याबाबत अधिकृत वृत्त दिलं होतं.

 

News English Summary: The corona has infected 42 employees at a manufacturing plant of the famous mobile maker Nokia in Sriperumbudur in Tamil Nadu. The company’s plant is currently closed.

News English Title: Corona has infected 42 employees at a manufacturing plant of the famous mobile maker Nokia in Sriperumbudur in Tamil Nadu News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या