9 May 2025 9:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
7/12 Utara | कौटुंबिक जमीनीच्या 7/12 वर तुमचं नाव आहे? वारसा हक्काने 7/12 वर नाव जोडण्यासाठी लागतात ही कागदपत्रं SBI Mutual Fund | नोकरदारांनो, डोळे झाकुन पैसे गुंतवा या SBI फंडात, एसआयपी वर दिला 1,04,23,471 रुपये परतावा EPFO Pension Amount | तुमचा बेसिक पगार किती आहे? खाजगी कंपनी पगारदारांना महिना 6,429 रुपये पेन्शन मिळणार, अपडेट आली Cash Limit At Home | तुम्ही घरामध्ये किती कॅश ठेवू शकता; नियम लक्षात ठेवा, अन्यथा इन्कम टॅक्स नोटीस येईल Cheque Bounce Alert | चेकने पेमेंट करणाऱ्या 90% लोकांना माहित नाही, ही चुका करू नका, सर्वकाही गमावून बसाल EPFO Money Alert | खाजगी कंपनी कर्मचाऱ्यांसाठी अपडेट, तुमच्या खात्यात EPF चे 1,56,81,573 रुपये जमा होणार Horoscope Today | 09 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

BA, B.Sc आणि B.Com परीक्षा होणार नाहीत, उदय सामंत यांची माहिती

No Exams, BA, Bsc, B Com, Minister Uday Samant

मुंबई, १९ जून : बीए, बीएएसस्सी आणि बीकॉमच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार नाहीत. तसंच अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा होणार नाहीत अशी घोषणा आज उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली आहे. एटीकेटी संदर्भात येत्या दोन दिवसांत निर्णय घेतला जाईल असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे. अत्यंत महत्त्वाचा असा हा निर्णय घेण्यात आला आहे.

पहिला निर्णय हा होता की मागील सर्व सत्रांमध्ये उत्तीर्ण झालेल्या ज्या अंतिम सत्रातील वर्षातील विद्यार्थ्यांना परीक्षा न देता पदवी प्रमाणपत्र हवे असल्यास तसे त्यांच्याकडून लेखी स्वरुपात घेऊन विद्यापीठाने योग्य ते सूत्र वापरुन त्यांचा निकाल जाहीर करावा. याचा अर्थ असा की ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांनी तसं लेखी विद्यापीठाला द्यायचं आहे. ज्यांना परीक्षा द्यायची नाही त्यांनीही विद्यापीठाला लेखी द्यायचं आहे असंही उदय सामंत यांनी म्हटलं आहे. या सगळ्या विद्यार्थ्यांचे सरासरी गुण काढून त्यांना पदवी प्रदान केली जाईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं.

कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या, इंजिनिरिंग, फार्मसी, आदी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेता येणार नाहीत. यासाठी राज्य सरकारने, राज्य आपत्कालीन व्यवस्थापन समितीने निर्णय घेतला आहे. ATKT चा अजून निर्णय घेतला नाही. मात्र सरकारने त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांचा बॅकलॉग शिल्लक आहे, त्यावर कुलगुरु निर्णय घेतील. त्यांची एक बैठक घेऊन त्यावर निर्णय घेतला जाईल, असं उदय सामंत यांनी सांगितलं. तसंच मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी घेतलेला निर्णय योग्य होता असं सांगायला ते विसरले नाहीत.

 

News English Summary: There will be no final year examinations for BA, BASSC and BCom. Higher and Technical Education Minister Uday Samant has also announced that there will be no examinations for non-professional courses. Uday Samant has also said that a decision will be taken in the next two days regarding ATKT. This is a very important decision.

News English Title: No Exams For BA Bsc And Bcom Says Minister Uday Samant News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Maharashtra(207)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या