4 May 2025 4:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | आयटी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा जाणून घ्या - NSE: INFY Trident Share Price | शेअर प्राईस केवळ 26 रुपये; यापूर्वी दिला 5230% परतावा; फायद्याची अपडेट आली - NSE: TRIDENT Motherson Sumi Wiring Price | 55 रुपयांचा शेअर फोकसमध्ये; पुढची टार्गेट प्राईस अपडेट - NSE: MSUMI IRB Share Price | तुमच्याकडे आहे का हा स्वस्त शेअर? गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, डाऊनसाइड टार्गेट - NSE: IRB Vodafone Idea Share Price | धमाल होणार, पेनी स्टॉक प्राईसवर होणार असा सकारात्मक परिणाम - NSE: IDEA IREDA Share Price | फक्त विचार करू नका, फायद्याचे निर्णय घ्या, हा शेअर ठरू शकतो फायद्याची गुंतवणूक - NSE: IREDA JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER
x

कोरोनाचा फैलाव थांबेना, ठाण्यातही लॉकडाऊन वाढवला

Covid 19, Corona Virus, Thane, Lockdown

ठाणे, १० जुलै : महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या आता २ लाख ३० हजार ५९९वर पोहोचली आहे. त्यामुळे चिंता अधिकच वाढली आहे. काल दिवसभरात राज्यात तब्बल ६ हजार ८७५ नव्या कोरोबाधितांची नोंद झाली, तर २१९ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला. त्यामुळे राज्यातील कोरोनाबळींची संख्या ९ हजार ६६७ इतकी झाली आहे.

देशात महाराष्ट्राची राजधानी मुंबईला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. मुंबईत काल कोरोनाचे १ हजार २६८ नवे रुग्ण आढळले, तर ६८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ८९ हजार १२४वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा ५ हजार १३२ इतका झाला आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होतेय. पुण्यात काल दिवसभरात १ हजार ५७४ नव्या रुग्णांची नोंद झाल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३४ हजार १७०वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात पुण्यात ३३ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने येथील कोरोनाबळींचा आकडा ९७७ इतका झाला आहे.

दरम्यान, ठाण्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने १२ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला होता. मात्र लॉकडाऊनचा हा टप्पा संपण्याआधीच ठाणे पालिकेने १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबत ठाणे महानगर पालिकेने आदेश जारी केले आहेत.

ठाण्यातील कोरोनाबाधितांच्या आकड्याने कहर केला आहे. त्यामुळे ठाणे शहरात लॉकडाऊन करणं गरजेचं असल्याचं पालिकेकडून सांगण्यात आलंय. १२ जुलै रोजी सकाळी ७ वाजल्यापासून पुन्हा लॉकडाऊन सुरू होणार असून १९ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत लॉकडाऊनचे नियम नागरिकांना पाळावे लागणार आहेत, असे आदेशात म्हटलं आहे. दरम्या, घरकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मुभा देण्यात आली आहे.

 

News English Summary: However, before the end of this phase of lockdown, Thane Municipal Corporation has decided to extend the lockdown till July 19. Thane Municipal Corporation has issued orders in this regard.

News English Title: Lockdwon extend in Thane till 19 July Covid 19 News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#CoronaCrisis(1404)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या