3 May 2025 12:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

बुलेट ट्रेनची आवश्यकता असेल तर मुंबई-नागपूरला जोडणारी बुलेट ट्रेन द्या - उद्धव ठाकरे

Need a bullet train, CM Uddhav Thackeray, PM Narendra Modi, dream project

मुंबई, २६ जुलै : शिवसेना खासदार आणि दैनिक ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील मतभेद, भाजपचं ऑपरेशन लोटस यासह अनेक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केलं आहे. तसंच सरकार जरी तीन पक्षांचं असलं तरीही स्टेअरिंग माझ्याच हातात आहे, असं म्हणत मित्रपक्षांना सूचक इशाराही दिला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध आज प्रसिद्ध झाला. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी वादाचा विषय ठरलेल्या बुलेट ट्रेनबाबत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, राज्य म्हणून बुलेट ट्रेनची आवश्यकता असेल तर मी म्हणेन माझ्या मुंबई-नागपूरला जोडणारी बुलेट ट्रेन द्या. माझी राजधानी आणि उपराजधानी जोडणारी ट्रेन द्या. जेणेकरून विदर्भाच्या मनात कारण नसताना जो दुरावा निर्माण करून देण्याचा प्रयत्न होतो. तो दुरावा नष्ट होईल. जसा समृद्धी महामार्ग होतोय. त्याला आता शिवसेनाप्रमुखांचं नाव दिलंय. तसंच मुंबई नागपूर जोडणारी बुलेट ट्रेन द्या, मला आनंद होईल.

मुंबई-सुरत बुलेट ट्रेनची आता आवश्यकता नाही. बुलेट ट्रेन असली तरी बुलेट ट्रेनचा विषय आता बॅकसिटला गेला आहे. त्यावर काही चर्चा झालेली नाही. तसेच कुणी विचारपुसही करत नाही. यावरही आता राज्य सरकारला राज्याच्या हिताचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल. माझी वैयक्तिक भूमिका वेगळी आहे, ती जनतेसोबत राहण्याची आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, बुलेट ट्रेनसाठी ज्यांनी स्वत:हून जमीन दिली. त्यांचा व्यवहार आता पूर्ण झालेला असेल. मात्र ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांचा अजूनही भूसंपादनाला विरोध आहे. त्यांच्यामागे शिवसेना ठामपणे उभी आहे. जसा नाणारचा विषय आहे. नाणारचासुद्धा सरकारने करार केलाच होता. पण तो जनतेने हाणून पाडला. आम्ही शिवसेना म्हणून जनतेसोबत उभे राहिलो. आता सगळ्यांना मान्य असले तर करू करार, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

तसेच ऑपरेशन लोटस’ महाराष्ट्रात यशस्वी होणार नाही, करून बघा ना. मी भाकीत कसे करणार? तुम्ही करून बघा. फोडाफोडी करून बघा. एक महत्त्वाचा मुद्दा काय की, असा कोणताही विरोधी पक्षांतला नेता दाखवा, जो दुसऱ्या पक्षात जाऊन सर्वोच्च पदावर गेलाय, मुख्यमंत्री झालाय. तुम्हाला तुमच्या पक्षात असं काय मिळत नाहीय की, तुम्ही दुसऱया पक्षात जाताय. कित्येक ठिकाणी अशी उदाहरणं आहेत, अशी फोडाफोडी होते त्यामागे ‘वापरा आणि फेकून द्या’ ही नीती सर्वांनी अवलंबली आहे असं उद्धव ठाकरे म्हणाले.

 

News English Summary: The second half of the interview given by the Chief Minister of the state and Shiv Sena chief Uddhav Thackeray was published today. In this, Uddhav Thackeray presented his role regarding the controversial bullet train.

News English Title: Need a bullet train or not CM Uddhav Thackeray speaks clearly on Modi dream project News Latest Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या