10 May 2025 11:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Total Gas Share Price | तज्ज्ञांकडून BUY कॉल, अदानी टोटल गॅस शेअर फोकसमध्ये, अपडेट नोट करा - NSE: ATGL Adani Green Share Price | 30 टक्के कमाईची संधी, या मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: ADANIGREEN Adani Energy Solutions Share Price | 58% परतावा मिळेल, सुवर्ण संधी, अदानी ग्रुपचा शेअर खरेदी करा - NSE: ADANIENSOL Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअर्ससाठी BUY रेटिंग, संधी सोडू नका, मिळेल मोठा परतावा - NSE: ADANIPORTS Adani Enterprises Share Price | 40% अपसाईड तेजीचे संकेत, अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार - NSE: ADANIENT Post Office Scheme | पगारदारांनो, या पोस्ट ऑफिसच्या योजनेत 2 लाख रुपये जमा करा, मिळावा 89,989 रुपये निश्चित व्याज Horoscope Today | 10 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

जगभरातील सर्व क्षेत्रातील पंजाबी लोकं मोदी सरकार विरोधात एकत्र | शेतकऱ्यांसाठी मैदानात

International boxer Vijender Singh, Farm Bills, Farmers protest, Return Khel Ratna Award

नवी दिल्ली, ६ डिसेंबर: मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याच पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी मोदी सरकार आणि संघटनांची शनिवारी बैठक झाली. परंतु, या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागणीवर अद्याप पूर्णपणे तोडगा निघाला नसून आता पुढची चर्चा ही 9 डिसेंबरला होणार आहे. मात्र तत्पूर्वी म्हणजे ८ डिसेंबरला शेतकरी संघटनांनी भारत बंद पुकारला आहे. त्याला राजकीय पक्षांचा जाहीर पाठिंबा मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र जगभरातील सर्वच क्षेत्रातील पंजाबी एकवटल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

दिल्लीच्या सिंघू सीमेवर शेतकरी थंडीत गेल्या १० दिवसांपासून दिवसरात्र ठिय्या मांडून बसले आहेत. सिंघू सीमेवर आज बॉक्सर विजेंदर सिंग देखील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी पोहोचला (Boxer Vijender Singh has also reached the Singhu border today to support the farmers) आहे. “शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत आणि कृषी क्षेत्रातील हे काळे कायदे रद्द झाले नाहीत. तर मी मला देण्यात आलेला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार परत करणार (I will return the Rajiv Gandhi Khel Ratna said Boxer Vijender Singh) आहे”, असा इशारा विजेंदर सिंगने दिला आहे. खेलरत्न पुरस्कार हा देशातील क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार आहे. तत्पूर्वी कॅनडा देशाच्या राजकारणात दबदबा असलेल्या पंजाबी लोकांमुळे तिथल्या सरकारने देखील या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

दुसरीकडे काँग्रेसने अधिकृतरित्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून येत्या ८ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णयही घेतला आहे. काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी ही माहिती दिली. खेडा म्हणाले, “आठ तारखेला होणाऱ्या भारत बंदला काँग्रेस पक्षाचं समर्थन असेल. आम्ही आमच्या पक्ष कार्यालयांबाहेरही आंदोलन करणार आहोत. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राहुल गांधींनी टाकलेलं हे मजबूत पाऊल असेल. भारत बंद आणि आंदोलन यशस्वी होवो यासाठी आम्ही प्रयत्न करु.”

 

News English Summary: Farmers have been sitting on the Singhu border in Delhi for the last 10 days. Boxer Vijender Singh has also reached the Singhu border today to support the farmers. “If the demands of the farmers are not met and these black laws in the field of agriculture are not repealed, then I will return the Rajiv Gandhi Khel Ratna award given to me,” Vijender Singh warned. The Khel Ratna Award is the highest award in the field of sports in the country. Earlier, due to the dominance of Punjabis in Canadian politics, the Canadian government has also supported the movement.

News English Title: International boxer Vijender Singh reaches farmers protest warning return Khel Ratna Award news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Farmer(119)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या