5 May 2024 11:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

भारत बंद’ला काँग्रेसचा जाहीर पाठिंबा | शेतकऱ्यांसोबत थेट रस्त्यावर उतरणार

Congress supports, Bharat bandh, new agriculture law, farmers protest

नवी दिल्ली, ६ डिसेंबर: मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याच पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी मोदी सरकार आणि संघटनांची शनिवारी बैठक झाली. परंतु, या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागणीवर अद्याप पूर्णपणे तोडगा निघाला नसून आता पुढची चर्चा ही 9 डिसेंबरला होणार आहे. मात्र तत्पूर्वी म्हणजे ८ डिसेंबरला शेतकरी संघटनांनी भारत बंद पुकारला आहे. त्याला राजकीय पक्षांचा जाहीर पाठिंबा मिळण्यास सुरुवात झाली आहे.

काँग्रेसने अधिकृतरित्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून येत्या ८ डिसेंबर रोजी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदमध्ये सहभागी होण्याचा निर्णयही घेतला आहे. काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी ही माहिती दिली. खेडा म्हणाले, “आठ तारखेला होणाऱ्या भारत बंदला काँग्रेस पक्षाचं समर्थन असेल. आम्ही आमच्या पक्ष कार्यालयांबाहेरही आंदोलन करणार आहोत. शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ राहुल गांधींनी टाकलेलं हे मजबूत पाऊल असेल. भारत बंद आणि आंदोलन यशस्वी होवो यासाठी आम्ही प्रयत्न करु.”

दरम्यान, ‘एनडीए’तून बाहेर पडलेल्या दोन पक्षांची एकजूट होताना दिसत आहे. शिरोमणी अकाली दलाचे उपाध्यक्ष आणि खासदार प्रेमसिंग चंदू माजरा (Prem Singh Chandumajra) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांच्या भेटीसाठी मुंबईत आले. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी ही भेट झाली. शेतकऱ्यांच्या सर्व आंदोलनांना शिवसेनेने पाठिंबा दिला असून दिल्लीच्या समन्वय बैठकीमध्ये देखील शिवसेना सहभागी होणार आहे.

 

News English Summary: The Congress has officially supported the farmers ‘agitation and has decided to join the farmers’ strike called by the farmers on December 8. Congress spokesperson Pawan Kheda gave this information. Kheda said, “The Bharat Bandh on the 8th will have the support of the Congress party. We will also protest outside our party offices. This will be a strong step taken by Rahul Gandhi in support of the farmers. We will work for the closure of India and the success of the movement. ”

News English Title: Congress supports Bharat bandh called by farmers against new agriculture law news updates.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x