28 April 2024 5:39 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

केंद्राने केलेला कृषी कायदा रद्द होणार नाही | चंद्रकांत पाटलांचं पवारांना थेट प्रतिउत्तर

New agriculture law, Not repealed, BJP State President Chandrakant Patil

पुणे, ६ डिसेंबर: मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. याच पार्श्वभूमीवर तोडगा काढण्यासाठी मोदी सरकार आणि संघटनांची शनिवारी बैठक झाली. परंतु, या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागणीवर अद्याप पूर्णपणे तोडगा निघाला नसून आता पुढची चर्चा ही 9 डिसेंबरला होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकार देखील हट्टाला पेटल्याची चर्चा दिल्लीत रंगली आहे.

याच विषयाला नुसरून प्रसार माध्यमांशी बोलताना शरद पवार यांनी शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं. “पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचं देशाच्या कृषी क्षेत्रात खूप मोठं योगदान आहे. या राज्यातील शेतकऱ्यांकडून पिकवला जाणारा गहू आणि तांदूळ केवळ देशातच नाही तर इतर १७ ते १८ देशांना निर्यात केला जातो. त्यामुळे पंजाब आणि हरियाणातील शेतकरी रस्त्यावर उतरतो तेव्हा त्याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. केंद्र सरकारने आता शहाणपणाची भूमिका घ्यायला हवी”, असं शरद पवार म्हणाले.

पण काही केल्या हा कायदा रद्द होणार नाही असं ठाम वक्यव्य भाजपचे नेते चंद्रकांत पाटील (BJP State President Chandrakant Patil ) यांनी केलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना चंद्र्कांत दादांनी कायदा रद्द होणार नसल्याचं ठणकावून सांगितलं आहे. केंद्राने कृषी कायद्यावर शहाणपणाची भूमिका घ्यावी असं पवारांनी म्हटलं होतं. त्यावर चंद्रकांत पाटलांनी थेट प्रत्युत्तर दिलं आहे. केंद्र सरकारने केलेल्या कायद्यात नवीन काही बदल केला नाही. जे जुन्या कायद्यात होतं तेचं आहे. फक्त आता या कायद्याने शेतकऱ्यांना मार्केटच्या बाहेर माल विकण्याची परवानगी मिळाली जी आधी नव्हती असं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. ते पुण्यात आजोयित कार्यक्रमात बोलत होते.

 

News English Summary: BJP leader Chandrakant Patil has said that the law will not be repealed if something is done. Replying to the statement made by NCP’s Sharad Pawar, Chandrakant Dada said that the law will not be repealed. Pawar had said that the Center should play a wise role on agricultural law. Chandrakant Patil has responded directly to that.

News English Title: New agriculture law will not repealed said BJP State President Chandrakant Patil news updates.

हॅशटॅग्स

#Chandrakant Patil(123)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x