2 May 2025 1:30 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN Post office Schemes | पोस्ट ऑफिसच्या 5 जबरदस्त योजना, गुंतवणूक करून बँक FD पेक्षा जास्त व्याज मिळवा SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा
x

देशात मृत्यूचं तांडव | दबाव वाढला, ब्रिटनला पाठवायचे कोवीशील्डचे 50 लाख डोस भारतातच दिले जाणार

Vaccination

नवी दिल्ली, ०८ मे | देशात शुक्रवारी प्रथमच एका दिवसात ४,१९१ मृत्यू झाले. एवढे मृत्यू कोरोना काळाच्या सुरुवातीच्या ३ महिन्यांत झाले होते. दुसरीकडे, पुन्हा ४ लाखांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २,१८,८६,५५६ झाली असून त्यापैकी १,७९,१७,०१३ रुग्ण बरे झाले आहेत.

दरम्यान, देशात सध्याच्या घडीला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भलतीच चिंता वाढवली आहे आणि त्यामुळे मोदी सरकारवर प्रचंड दबाव वाढला आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णांची संख्या आता तीन लाखांहून चार लाखांच्या पुढे गेली आहे. कोरोनाबळींचा आकडाही धडकी भरवू लागला आहे. ही लाट थांबताच तिसऱ्या लाटेच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. अशा परिस्थितीत तिसऱ्या लाटेचा धोका कमी करण्यासाठी सरकारला कोरोना लसीकरण मोहिमेला गती देण्याचा एक पर्याय समोर दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारने कोविशिल्ड लसीच्या 50 लाख डोसची ब्रिटनवारी थांबवली आहे.

पुण्यातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियामध्ये कोवीशील्ड बनवली जात आहे. या इंस्टीट्यूटमध्ये गव्हर्नमेंट अँड रेग्युलेटरी अफेअर्स डायरेक्टर प्रकाश कुमार सिंह यांनी नुकतेच केंद्र सरकारला एक पत्र लिहून व्हॅक्सीन UK मध्ये पाठवू नये अशी परवानगी मागितली होती. केंद्र सरकारने याची परवानगी देत हे डोस आता राज्यांना सोपवण्याचा निर्णय घेतला आहे.

इंग्लंडसाठी ठेवण्यात आलेले जे 50 लाख डोस होते आता ते देशात वापरले जातील. हे डोस 21 राज्यांमध्ये पाठवले जातील. काही राज्यांना 3.5-3.5 लाख डोस मिळतील. काही राज्यांना एक-एक लाख डोस मिळतील. दोन राज्यांना 50-50 हजार डोस पाठवले जातील. सरकारने राज्यांमध्ये कोरोना प्रकरणे पाहता तेथे पाठवल्या जाणाऱ्या लसींचे वर्गीकरण केले आहे.

 

News English Summary: A covishield is being made at the Serum Institute of India in Pune. Prakash Kumar Singh, director of government and regulatory affairs at the institute, had recently written a letter to the central government seeking permission not to send the vaccine to the UK. The central government has decided to hand over the dose to the states.

News English Title: Covishield vaccine order to England is cancel by India govt news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Vaccination(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या