2 May 2024 4:04 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

अजब सरकार | परदेशातून येणारी व्हॅक्सिन GST मुक्त, तर राज्य सरकारच्या व्हॅक्सिन ऑर्डरवर करोडोचा टॅक्स

Vaccination

नवी दिल्ली, ०८ मे | देशात शुक्रवारी प्रथमच एका दिवसात ४,१९१ मृत्यू झाले. एवढे मृत्यू कोरोना काळाच्या सुरुवातीच्या ३ महिन्यांत झाले होते. दुसरीकडे, पुन्हा ४ लाखांपेक्षा जास्त नवे रुग्ण आढळले. देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २,१८,८६,५५६ झाली असून त्यापैकी १,७९,१७,०१३ रुग्ण बरे झाले आहेत. शुक्रवारी महाराष्ट्रातून दिलासादायक वृत्त आले. तेथे नव्या रुग्णांत सुमारे ८ हजारांची घट झाली. दरम्यान, अनेक राज्यांनी लसीकरणावर भर दिला असला तरी त्यांना लस पुरवठा होताना दिसत नाही.

दुसरीकडे कोरोना महामारीच्या काळातही केंद्र सरकार कमाई करण्यात गुंतली असल्याचा आरोप राजस्थानचे आरोग्यमंत्री सुभाष गर्ग यांनी केला आहे. गर्ग म्हणाले की, राज्य सरकारला देण्यात येणारा कोरोना लसीवर केंद्र सरकार 5% जीएसटी आकारत आहे. सीरम इन्स्टिट्यूट राज्याला 315 रुपयांना डोस देत आहे. त्याची मूळ किंमत 300 रुपये आहे.

गर्ग यांच्यानुसार राजस्थान सरकारने 18+ लसीकरणासाठी सीरम इन्स्टिट्यूटला पहिल्या खेपेत 3.75 कोटी व्हॅक्सिन डॉसची ऑर्डर दिली होती. प्रत्येक डोसवर केंद्र सरकार 15 रुपये कर आकारत आहे. पहिल्या खेपेच्या ऑर्डरसाठीच 56 कोटींपेक्षा जास्त जीएसटी द्यावा लागत आहे. गर्ग यांचा असा दावा आहे की, 18 वर्षांवरील संपूर्ण लोकांना दोन्ही डोस लागू करण्यासाठी 7.50 कोटी लस लागतील. दोन्ही खेप एकत्र करून केंद्र सरकार 112 कोटींचा जीएसटी लावेल. जर केंद्राने जीएसटी माफ केले तर 18 लाखापेक्षा जास्त लोकांना व्हॅक्सिनचे दोन्ही डोस देण्याएवढा पैसा वाचेल.

परदेशातून येणारी व्हॅक्सिन GST मुक्त:
केंद्र सरकारने नुकतीच परदेशातून येणाऱ्या कोरोना व्हॅक्सिनला जीएसटीमधून सूट दिली होती. देशात तयार होणाऱ्या व्हॅक्सिनवर अजूनही 5% जीएसटी लावला जात आहे. अनेक राज्ये केंद्र सरकारला पत्र लिहून देशात बनवल्या जाणार्‍या कोरोना व्हॅक्सिनला करमुक्त करण्याची मागणी करत आहेत.

 

News English Summary: According to Garg, the Rajasthan government had ordered 3.75 crore vaccine doses in the first batch to the Serum Institute for 18+ vaccinations. The central government is levying a tax of Rs 15 on each dose. More than Rs 56 crore GST has to be paid for the first batch order alone.

News English Title: Rajasthan government has paid more than 56 crore GST on first order vaccine said Garg news updates.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)#Vaccination(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x