बेरोजगारी-उपासमारीचं चित्र गडद होतंय | यूपीत युवक चक्क रस्त्याव सांडलेले दूध प्यायला

लखनऊ, १० मे | देशातील कोरोनाच्या दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन केल्याने बेरोजगारी आणि उपासमारीचा प्रश्न भीषण झाल्याचं चित्र आहे. कोरोना व्हायरसचा वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता देशातील अनेक राज्यांनी लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेतलेला आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांच्या नोकर्या गेल्या असून कित्येक लोक बेरोजगार झाले आहे.
दरम्यान, देशातील असंघटीत क्षेत्रातील लोकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहे. याचाच प्रत्यय म्हणून उत्तर प्रदेशातील कानपुर शहरामध्ये एका युवकाने पोटाची आग विझवण्यासाठी चक्क रस्त्यावरचे दूध प्यायले आहे. यावरुन लॉकडाऊनमध्ये लोक किती असहाय झाले आहे हे लक्षात येते. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून हा प्रसंग कानपूर जिल्ह्यातील सुतारखाना येथील असल्याचे सांगितले जात आहे.
उपस्थित सुतारखान्यातील लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी एका दुधावाल्याची सायकल पलटी होऊन दूध रस्त्यावर सांडले होते. दरम्यान, तेथून एक तरुण जात असताना त्याने रस्त्यावर पसलेले दूध बघितले. त्या तरुणाला खूप भूक लागली असल्याने आपला गुडघा रस्त्यावर टेकत त्याने चक्क रस्त्यावरील दूध प्यायला सुरुवात केली. हे पाहून लोकांना त्याच्यावर दया आली आणि त्याला त्यांनी भोजन आणून दिले.
उत्तर प्रदेशात दीर्घकाळ लॉकडाऊनमुळे कामगारांसमोर अन्नाचे संकट निर्माण झाले आहे. कोरोनामुळे लावलेल्या या लॉकडाऊनमुळे बरेच कामगार बेरोजगार झाले आहेत. विशेष म्हणजे कानपूर हे देशातील औद्योगिक शहर म्हणून ओळखले जाते. येथे मोठ्या संख्येने कामगार कारखाने व छोट्या कारखान्यांमध्ये काम करतात. लॉकडाऊन दरम्यान अनेक युनिट्स बंद झाले असल्यामुळे यामधील काम करणारे कामगार अस्वस्थ आहेत.
News English Summary: A milkman’s bicycle overturned and milk was spilled on the road. Meanwhile, as a young man was passing by, he saw milk spilled on the road. The young man was so hungry that he knelt down on the road and started drinking milk from the street. When the people saw this, they took pity on him and brought him food.
News English Title: Corona pandemic India no food impact is getting highlighted in nation slowly news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL