3 May 2025 5:51 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

राज्यात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता | म्यूकोरमायकोसिसवर 1000 रुग्णालयांमध्ये मोफत उपचार

Maharashtra corona pandemic

मुंबई, ११ मे | राज्यात कोरोना संक्रमणाच्या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. गेल्या 24 तासांमध्ये 37 हजार 236 नवीन प्रकरणे समोर आली. तर 61 हजार 607 रुगण बरेही झाले. हा आकडा 31 मार्चला आलेल्या 39 हजार 544 च्या जवळपास आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर 86.97% झाला आहे. राज्यात आतापर्यंत 44 लाख 59 हजार 425 रुग्ण कोरोना संक्रमणानंतर बरे झाले आहेत.

आकड्यांमध्ये दिलासा असला तरीही राज्यात पुन्हा 15 दिवस म्हणजेच 30 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवले जाऊ शकते. सूत्रांनुसार, बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. या दरम्यान राज्याच्या 11 शहरांमध्ये हार्ड लॉकडाऊन सुरू आहे. येथे दूध, किराणा आणि भाजीच्या दुकाना वगळता सर्व काही बंद आहे. या शहरांमध्ये ऑनलाइन फूड आणि इतर आवश्यक वस्तूंची डिलीवरी सुरू आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी म्हटले की, म्यूकोरमाइकोसिसच्या रुग्णांवरील उपचार राज्य सरकारच्या प्रमुख वैद्यकीय विमा योजनानुसार राज्याच्या 1 हजार हॉस्पिटलमध्ये मोफत केला जाईल. म्यूकोरमाइकोसिस एक दुर्मिळ कवक (फंगल) इन्फेक्शन असते. जे आता कोरोना व्हायरसने संक्रमित असलेल्या व्यक्तींमध्ये समोर येत आहे.

 

News English Summary: Health Minister Rajesh Tope on Monday said that treatment of patients with mucomycosis would be provided free of cost in 1,000 hospitals in the state as per the state government’s flagship medical insurance scheme. Mucormycosis is a rare fungal infection. Which is now occurring in individuals infected with the corona virus.

News English Title: Treatment of patients with mucomycosis would be provided free of cost in 1000 hospitals in the Maharashtra news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Health(777)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या