4 May 2025 1:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

91.6 टक्के परिणामकारक रशियन स्पुतनिक लसीची भारतातील प्रति डोस किंमत 995 रुपये

Vaccination

हैदराबाद, १४ मे | रशियातून आलेल्या स्पुतनिक (Sputnik V) या लसीची किंमत जाहीर करण्यात आली आहे. या लसची किंमत 948 रुपये असेल. मात्र त्यावर 5 टक्के जीएसटी आकारण्यात येणार आहे. भारतात स्पुतनिक लस आयात करणारी कंपनी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने ही माहिती दिली आहे. या डोसला सेंट्रल ड्रग्स लॅबोरेटरीजकडून आवश्यक परवानग्या मिळाल्या असल्याचं कंपनीने स्पष्ट केलं आहे.

स्पुतनिक व्ही ही लस भारतात मंजुरी मिळालेली तिसरी कोरोनावरील लस आहे. ही लस 91.6 टक्के परिणामकारक आहे. डॉ. रेड्डीजने आज हैदराबादमध्ये पहिला डोस दिल्याची माहिती दिली. रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंडद्वारे डॉ. रेड्डीजने रशियासोबत करार केला आहे. यानुसार या लशीचे उत्पादन भारतात केले जाणार आहे.

दरम्यान, रशियातून आयात केलेल्या या स्पुतनिक व्ही लसीची किंमत 948 रुपये प्रति डोस आहे. परंतू त्यामध्ये 5 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. यामुळे या लशीची किंमत 995.4 रुपये होत आहे. यामुळे 1000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत हा डोस उपलब्ध होणार आहे.

 

News English Summary: The Sputnik V vaccine imported from Russia costs Rs 948 per dose. But it is subject to 5 per cent GST. As a result, the vaccine is priced at Rs 995.4. This will make the dose available for less than Rs 1,000.

News English Title: The Sputnik V vaccine per dose price in India is rupees 995 declared by Dr Reddy company news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Vaccination(44)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या