2 May 2024 3:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

नाहीतर भाजपचे 'रामनाम सत्य' होईल: उद्धव ठाकरे

मुंबई : भारतीय जनता पक्षाने लवकरात लवकर अयोध्येतील राम मंदिर उभारावे नाहीतर हिंदू समाज त्यांचे ‘राम नाम सत्य’ केल्याशिवाय राहणार नाही असा थेट गर्भित इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून भाजपला दिला आहे. तसेच राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपने हिंदू जनतेचा भ्रमनिरास केल्याचा आरोपही शिवसेनेने मुखपत्रातून केला आहे.

सध्या केंद्रात,राज्यात तसेच फैजाबाद महानगरपालिकेत तिन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचीच सत्ता असून देखील अयोध्येत राम मंदिर का होत नाही असा थेट सवालही शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून विचारला आहे. तसंच जर न्यायालयीन मार्गाने होत नसेल तर केंद्र सरकारने थेट अध्यादेश आणून राम मंदिर उभारावे असा सल्ला देखील शिवसेनेने भारतीय जनता पक्षाला दिला आहे. भारतीय जनता पक्षावर टीका करताना बाबरी पाडण्याचं काम शिवसैनिकांनी चोख बजावलं असून खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी त्याची जबाबदारी घेतली होती याची आठवण सुद्धा शिवसेनेने यावेळी भाजपला करून दिली आहे. सगळी सत्ता हातात असताना रामाचा अयोध्येतला ‘वनवास’ संपवावा अन्यथा तुमचं बरं होणार नाही, असा इशाराच शिवसेनेने या अग्रलेखातून दिला आहे.

काय म्हटलं आहे नेमकं अग्रलेखात;

  •  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त ‘जय श्रीराम’च्या घोषणा देतात, पण राममंदिराच्या उभारणीबाबत एक शब्दही बोलत नाहीत. ते राम मंदिर उभारणार नाहीत ,ही हिंदू जनभावना
  • मोदी हिंदुत्व, राममंदिर वगैरे विषयांवर बोलत नाहीत आणि जे बोलतात त्यांना त्रास देत आहेत. खरंतर रामभक्तांच्या रक्ताने शरयू लाल झाली तेव्हा कोठे भाजप दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचला.
  • राममंदिराचे काय व्हायचे ते आता सर्वोच्च न्यायालयातच होईल असे सांगणे हे ढोंग आहे. सर्वोच्च न्यायालयास विचारून पंचवीस वर्षांपूर्वी ‘राममंदिराची लढाई’ आपण सुरू केली नव्हती.
  • न्यायालयाने काय करायचे ते करू द्यात, पण ट्रिपल तलाक, एस.सी.-एस.टी. अत्याचार प्रतिबंधक कायद्यासंदर्भात जसे न्यायालयीन निर्णयास बाजूला ठेवून अध्यादेश काढले तसा अध्यादेश राममंदिराच्या बाबतीत काढायला काहीच हरकत नाही.
  • केंद्रात भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये याच पक्षाची सरकारे आहेत. राष्ट्रपती, राज्यपाल, पंतप्रधान, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री प्रत्येक पदावर भारतीय जनता पक्षाचाच निष्ठावंत बसला आहे. मग अयोध्येतील राममंदिर उभारणीच्या वचनपूर्तीत कसली अडचण?

हॅशटॅग्स

#udhav Thakarey(405)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x