17 May 2024 2:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, संधी सोडू नका Rajnish Retail Share Price | अवघ्या 63 पैशाचा शेअर! 4 वर्षात दिला 14000% परतावा, स्टॉक आजही स्वस्त आणि फायद्याचा Suzlon Share Price | सुझलॉन स्टॉक ब्रेकआऊट लेव्हल अपडेट, शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा सल्ला काय? IREDA Share Price | तज्ज्ञांचा IREDA शेअर्स 'Hold' चा सल्ला, या प्राईसवर मजबूत सपोर्ट, पुढची टार्गेट प्राईस जाहीर HDFC Mutual Fund | अबब! जबरदस्त म्युच्युअल फंड योजना, 10,000 रुपयांच्या SIP वर 9.57 कोटी रुपये परतावा दिला Gold Rate Today | टेन्शन वाढलं! आज सोन्याचा भाव अजून महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या My EPF Money | पगारदारांनो! तुमच्या खात्यातही पैसे जमा झाले असतील तर पटापट तपासून घ्या, नियम बदलला
x

भारताचा सर्वात अवजड उपग्रह जी.सॅट-११ चं यशस्वी प्रक्षेपण, इंटरनेट स्पीडमध्ये क्रांती

नवी दिल्ली : भारताचं सर्वात अवजड उपग्रह म्हणजेच जी.सॅट-११ चं आज अवकाशात यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. तब्बल ५,८५४ वजन असणाऱ्या या उपग्रहाचं बुधवारी पहाटे युरोपिअन अवकाश केंद्र फ्रेंच गुएना येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. दरम्यान, हा एक कम्युनिकेशन उपग्रह आहे, जो भारतातील इंटरनेटचा वेग वाढवण्यास मदत करेल आणि त्यामुळे देशातील इंटरनेट स्पीडमध्ये क्रांती होण्याची आशा आहे. विशेष म्हणजे हा उपग्रह इतका विशाल आहे की, प्रत्येक सोलार पॅनल ४ मीटरपेक्षा मोठा आहे, जो एका मोठ्या रुम एवढा असल्याचं वृत्त आहे.

दरम्यान, याअगोदर म्हणजे वर्षाच्या सुरुवातील या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. परंतु काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने भारतीय अवकाश केंद्राने एप्रिल महिन्यात याची पुन्हा तपासणी करण्यासाठी फ्रेंच गुएना येथून पुन्हा मागवला होता. जीसॅट-६ए च्या अयशस्वी प्रयत्नानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. एप्रिल महिन्याच्या जवळपास जीसॅट-६ए नियंत्रणाच्या बाहेर गेला होता आणि २९ मार्चला त्याचे प्रक्षेपण होताच त्याचा पूर्णपणे संपर्क तुटला होता.

यानंतर जीसॅट-११ चं प्रक्षेपण कऱण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. अनेक निरीक्षण आणि काळजीपूर्वक तपासण्या केल्यानंतरच जीसॅट-११ चं प्रक्षेपण करण्याला हिरवा कंदील देण्यात आला. हा उपग्रह म्हणजे भारतातील इंटरनेट जगतातील मोठा गेम चेंजर ठरेल असा वैज्ञानिकांचा दावा केला आहे. त्यामुळे हा उपग्रह कार्यरत होताच देशातील इंटरनेट स्पीडमध्ये क्रांती येईल. जीसॅट-११ च्या सहाय्याने प्रति सेकंदाला १०० गीगाबाइट पेक्षा अधिक ब्रॉडबॅण्ड कनेक्टिव्हिटी मिळणे शक्य होईल.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x