29 April 2024 5:27 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 29 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 29 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या SBI Home Loan Interest | स्वस्त गृह कर्जाच्या शोधात आहात? या 9 बँकांचे स्वस्त व्याजदर नोट करा SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट
x

ED कारवाईनंतर 'माझं तोंड कोणीही बंद करू शकत नाही' अशी प्रतिक्रिया देणाऱ्या राज यांच्याकडून मोदींचे आभार

Raj Thackeray

मुंबई, 03 एप्रिल | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात प्रदीर्घ भाषण केलं. यावेळी राज ठाकरे यांनी प्रामुख्याने महाविकास आघाडी सरकारवर आणि त्यातही शिवसेनेवर अक्षरश: टीकेची झोड उठवली. तसंच मुख्यमंत्र्यांवर देखील अनेक गंभीर आरोप केले.

उत्तर प्रदेशात विकास होतोय :
मी २०१४ मध्ये म्हणालो होतो की, तीन राज्यांत विकास करा. तिथून लोक बाहेर पडताहेत. आज उत्तर प्रदेशात विकास होतोय. सगळ्यांचं ओझ घ्यायला महाराष्ट्र बसलेला नाही. वर्तमानपत्रातील ओळी वाचतात. त्या ओळींमधलं वाचत नाही. सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायचं असेल, तर त्यांच्याकडे उत्तम हत्यार आहे, ते म्हणजे जातीचं.

ईडीच्या धाडीवरून थेट पंतप्रधानांना विनंती :
माझी पंतप्रधानांना विनंती आहे. ईडीच्या, आयकरच्या धाडी टाकत आहात ना… आमच्या पोलिसांना विचारा, त्यांच्याकडे सोर्स आहे. झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या मदरशांमध्ये एकदा धाडी टाका. तुम्हाला काय काय हाताला लागेल, ते कळेल. आपल्याला पाकिस्तानची गरजच नाही. कशाला हवाय पाकिस्तान? उद्या जर काही घडलं, तर आतलं आवरता आवरता नाकीनऊ येतील इतक्या गोष्टी आतमध्ये भरलेल्या आहेत. आमचं लक्ष नाहीये. आम्हाला मतं हवीत. आम्हीच त्या झोपडपट्ट्या, मदरसे वाढवत आहोत.

मुख्यमंत्री लक्ष :
भाजप एक नंबरचा पक्ष, शिवसेना दोन नंबरचा पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस तीन नंबरचा पक्ष होता. तीन नंबरचा पक्ष एक आणि दोन नंबरच्या पक्षाला फिरवत होता. महाराष्ट्राच्या जनतेला काय सांगता. तुमचं अडीच अडीच वर्ष ठरलं होतं. तुमचं आतलं झंगाट होतं. तुम्हाला मतदान भाजप आणि शिवसेना म्हणून केलं होतं. शरद पवारांसोबत जाण्यासाठी केल नव्हतं. आम्ही सगळं विसरुन जातो. तास तास दोन तास उभे होतो. भाषण ऐकली, मतदन केलं निर्णय आला त्यावेळी महाराष्ट्राचा निर्णय वेगळा दिसला. याच्यासाठी मतदान करता, गुलाम आहात यांचे कोणीही यावं आणि फरपटतं न्यावं. लोकांनी विसरुन जावं हे यांना हवं आहे.

राज ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवरील ED कारवाई :
राज ठाकरे आणि त्यांचे व्यावसायिक सहकारी देखील ED च्या चौकशी फेऱ्यात अडकले होते. त्यात राज ठाकरे यांना तर ED कार्यालयात चौकशीसाठी तब्बल ८ तास बसवून ठेवण्यात आले होते. यावर त्यांना त्यावेळी पत्रकारांनी विचारले असता ‘कदाचित त्यांना वरून आदेश आले असतात आणि तास संदेश अधिकाऱ्यांना वर द्यायचा असेल अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली होती. विशेष म्हणजे त्यावेळी दिवसभरातील चौकशीनंतर कृष्णकुंजमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांना कार्यकर्त्यांनी गराडा घातला होता आणि त्यावेळी राज ठाकरे यांनी ‘माझं तोंड कोणीही बंद करू शकत नाही’ असा थेट इशारा मोदी सरकारला दिला होता. मात्र सध्याच्या राज ठाकरेंच्या भूमिकेवरून त्यांच्याभोवती संशय गडद होण्याची अधिक शक्यता आहे असं राजकीय तज्ज्ञांना वाटतंय.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Raj Thackeray Rally before BMC Election 03 April 2022.

हॅशटॅग्स

#Raj Thackeary(716)#Raj Thackeray(53)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x