2 May 2024 11:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Incredible India Kerala Tourism | केरळमधील निसर्गरम्य जटायू राष्ट्रीय उद्यानाला भेट द्या, भव्य जटायू पुतळा आणि सुंदर निसर्ग

Incredible India Kerala Tourism

Incredible India Kerala Tourism | सुमारे ६५ एकरात पसरलेली जटायूची मोठी मूर्ती पाहिली आहे का? न दिसल्यास यावेळी तुम्ही केरळच्या कोल्लम जिल्ह्याला भेट देऊन ते पाहू शकता. येथे चडयामंगलममधील जटायूची एक विशाल मूर्ती आहे, जी दूरदूरहून पर्यटक पाहण्यासाठी येतात. हा पुतळा चार टेकड्यांवर पसरलेला आहे. जटायू अर्थ सेंटर म्हणून ओळखले जाते.

ही जागा तुम्हाला मंत्रमुग्ध करेल :
ही जागा तुम्हाला मंत्रमुग्ध करून सोडेल. जगात इतरत्र कुठेही यापेक्षा मोठे पक्षी शिल्प आपल्याला पाहायला मिळणार नाही. इतकेच नव्हे तर जटायू अर्थ सेंटर हे प्रांताचे पहिले बीओटी (बिल्ड-ऑपरेटर-ट्रान्सफर) पर्यटन आहे. हे जटायू राष्ट्रीय उद्यान आणि जटायू रॉक म्हणून देखील ओळखले जाते. तुम्ही ह्या राष्ट्रीय उद्यानाचा फेरफटका मारू शकता आणि येथील जटायूच्या ह्या विशाल मूर्तीवर बारकाईने नजर टाकू शकता .

जगातील सर्वात मोठे पक्षी शिल्प :
जगातील सर्वात मोठे पक्षी शिल्प असा मान असलेल्या या पर्यटनस्थळाकडे मोठ्या संख्येने पर्यटक येऊन बारकाईने नजर टाकतात. हे ठिकाण समुद्रसपाटीपासून ३५० मीटर उंचीवर आहे. जटायूची ही मूर्ती २०० फूट लांब, १५० फूट रुंद आणि ७० फूट उंच आहे. त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झाली आहे. या टेकडीच्या माथ्यावर तुम्ही केबल कारने येथपर्यंत पोहचू शकता. जटायू रॉकमध्ये पर्यटकांना विविध प्रकारचे अनुभव घेता येतात.

विशाल मूर्तीच्या आत एक संग्रहालय :
या विशाल मूर्तीच्या आत एक संग्रहालय आणि ६ डी थिएटर आहे . येथून पर्यटकांना निसर्गाची विहंगम दृश्ये पाहता येतात आणि विविध प्रकारच्या साहसी खेळांमध्ये सहभागी होता येते. कॅम्पिंग आणि ट्रेकिंगही करू शकता. राष्ट्रीय उद्यान सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत खुले असते. त्यात जाण्यासाठी पर्यटकांना प्रवेश शुल्क भरावे लागते. केबल कारमधून या विशाल पुतळ्यापर्यंत पोहचू शकता आणि इकडे तिकडे फिरू शकता. उल्लेखनीय म्हणजे रामायणात जटायूने सीता मातेला वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला होता. रावणाने जटायूचे पंख कापले होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Incredible India Kerala Tourism packages for Jatayu Earths Center check details 27 July 2022.

हॅशटॅग्स

#Incredible India(10)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x