26 April 2024 12:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजी शेअर्स चार्टवर तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हल आणि टार्गेट प्राईस जाहीर RVNL Share Price | अल्पावधीत 1985 टक्के परतावा देणारा RVNL शेअर रॉकेट तेजीत धावणार, फायद्याची अपडेट आली Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर SBI Mutual Fund | तज्ज्ञांनी सुचवल्या 5 व्हॅल्यू फंड योजना, SBI सहित मालामाल करणाऱ्या टॉप SIP योजना सेव्ह करा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी अपडेट, थेट महागाई भत्ता आणि HRA होणार परिणाम Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या
x

Multibagger Stocks | एकेकाळी 2 रुपयांना ट्रेड करणाऱ्या शेअरने 95000 टक्के परतावा दिला, हा नफ्याचा स्टॉक लक्षात ठेवा

Multibagger stocks

Multibagger stocks | शेअर बाजारातील प्रत्येक गुंतवणूकदाराला वाटते की त्याच्याकडे असा स्टॉक असावा जेणेकरून त्याला कमी पैशात जबरदस्त परतावा मिळू शकेल. म्हणूनच नवीन गुंतवणूकदार चांगल्या क्षमता असलेल्या पेनी स्टॉकवर लक्ष ठेवून असतात आणि संधी मिळताच पैसे गुंगावतात. ज्यावेळी स्टॉकची किंमत 10 रुपयांच्या खाली असते, त्यावेळी गुंतवणूकदार कमी पैशात जास्तीत जास्त शेअर्स खरेदी करून ठेवतात. मात्र, कधी आणि कोणता स्टॉक रॉकेट सारखा वर जाईल हे सांगता येत नाही.

आज आपण अशाच एका जबरदस्त स्टॉकबद्दल माहिती घेणार आहोत. जो एकेकाळी पेनी स्टॉक होता पण आज त्याची किंमत 2,000 रुपयांच्या वर पोहोचली आहे. तेव्हापासून या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना एकूण 95000 टक्के परतावा मिळवून दिला आहे. आपण माहिती घेत आहोत दीपक नायट्रेटच्या शेअर्सबद्दल. हा स्टॉकची 1995 साली पहिल्यांदा BSE वर नोंद झाली होती. या स्टॉकमधील गुंतवणूकदारांना आणि तज्ज्ञांना शेअर्स अजून चांगला परतावा देतील अशी अपेक्षा आहे.

1 लाखाचे झाले 9 कोटी :
10 ऑगस्ट 2001 रोजी दीपक नायट्रेट कंपनीचा स्टॉक बीएसईवर 1.96 रुपयेवर ट्रेड करत होता. स्टॉक 29 जुलै 2022 रोजी 1915 रुपयांवर जाऊन बंद झाला. जर तुम्ही 10 ऑगस्ट 2001 रोजी दीपक नायट्रेटच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि ते होल्ड करून ठेवले असते तर तुमची गुंतवणूक रक्कम 9.75 कोटी रुपये झाली असती. या शेअर्स नी गेल्या 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 1000 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. या स्टॉकने आपला 3,020 रुपये हा आपला 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला होता. सध्या स्टॉक 1681 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीजवळ ट्रेड करत आहे. त्यामुळे आता शेअर्स मध्ये थोडा फार वाढ होईल, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. शुक्रवारी हा शेअर दिवसा अखेर सुमारे 12 रुपयांच्या वाढीसह बंद झाला.

परकीय गुंतवणूक :
मागील काही महिन्यात शेअर बाजारातून परकीय गुंतवणुकीचे निर्गमन सुरू होते. परकीय गुंतवणूकदार भारतीय बाजारातून शेअर विक्री करून गुंतवणूक काढून घेत असताना दीपक नायट्रेड कंपनीने त्यांना आपल्याकडे वळवले. दरम्यान परकीय गुंतवणूकदारांची गुंतवणूक वाढलेली दिसली आहे. 31 मार्चपर्यंत कंपनीत विदेशी गुंतवणूकदारांचा वाटा 8.76 टक्के होता, जो 11 जुलैपर्यंत वाढून 9.07 टक्के इतका वाढला आहे. या व्यतिरिक्त एलआयसी ने दीपक नायट्रेटमधील आपला हिस्सा 4.6 टक्के पर्यंत वाढवला आहे.

10 वर्षात 1 लाखाचे झाले 1 कोटी :
बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये 14 सप्टेंबर 2012 रोजी दीपक नायट्रेट कंपनीचे शेअर्स 17.19 रुपयांवर ट्रेड होते. कंपनीच्या शेअर्सनी मागील 10 वर्षांपेक्षा कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 10,000 टक्क्यांहून अधिक परतावा मिळवून दिला आहे. जर तुम्ही त्यावेळ दीपक नायट्रेटच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असते आणि ते होल्ड करून ठेवले असते तर तुमचे गुंतवणूक मूल्य आज 1 कोटींहून अधिक झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks Deepak nitrate share price return on 1 August 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x