28 April 2024 3:42 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारदारांची आवडती SBI म्युच्युअल फंड योजना, 1 लाखावर मिळेल 48 लाख रुपये परतावा Piccadily Agro Share Price | दारू नव्हे! दारू बनवणाऱ्या कंपनीचा शेअर खरेदी करा, प्रति महिना पैसा दुप्पट होतोय 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट OnePlus Nord 3 5G | वनप्लसचा लोकप्रिय OnePlus Nord 3 5G फोन 7250 रुपयांनी स्वस्त झाला, मोठा डिस्काउंट FD Interest Rate | पैशाने पैसा वाढवा! 1 वर्षाच्या FD वर या 3 बँक देत आहेत 7.75 टक्केपर्यंत व्याज, यादी सेव्ह करा HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल
x

सेना, भाजप की काँग्रेस? लोकसभेनंतर 'या' विधानसभा क्षेत्रातील चित्र स्पष्ट होणार

मुंबई : सध्या अंधेरी पूर्वेचा हा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेच्या खात्यात आहे. शिवसेनेचे रमेश लटके येथील विद्यमान आमदार आहेत. सदर मतदारसंघाचा समावेश असलेल्या उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून लोकसभेसाठी काँग्रेसकडून संजय निरुपम किंवा सुरेश शेट्टी यांच्यापैकी एकाला उमेदवारी मिळणार हे निश्चित आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेचं चित्र कोणाच्या बाजूने आहे याचा अंदाज येईल. या मतदारसंघात मराठी, उत्तर भारतीय, मुस्लिम आणि ख्रिश्चन समाजाचा सारखाच प्रभाव असल्याने हा मतदार संघ काहीसा मिश्र म्हणून परिचित आहे. कोणत्याही एकाच समाजाच्या मतांवर येथे निवडून येणे जवळपास अशक्य आहे. त्यामुळे याच लोकसभा क्षेत्रातील या महत्वाच्या विधानसभा क्षेत्रात लढाई खूपच अटीतटीची ठरणार आहे हे निश्चित.

दरम्यान, लोकसभेत भाजप-सेनेची युती न झाल्यास भाजप आणि शिवसेनेमध्ये मोठ्याप्रमाणावर मतविभाजन होणार यात शंका नाही. याच लोकसभा मतदारसंघातील मुस्लिम, ख्रिश्चन, बहुजन समाज आणि उत्तर भारतीय मतदारांची संख्या लक्षात घेऊनच संजय निरुपम यांनी त्यांच्या मुख्य लोकसभा मतदारसंघ सोडून उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलं आहे. तसेच संजय निरुपम यांची या लोकसभा मतदारसंघावर दावेदारी आणि नेमका त्याच्या काही दिवसांपूर्वीच संजय निरुपम यांचे कट्टर समर्थक समजले जाणारे काँग्रेसचे माजी नगरसेवक कमलेश राय यांचा शिवसेनेत प्रवेश म्हणजे संजय निरुपम यांचीच खेळी असल्याचे मानले जात आहे. त्यामुळे ते आतून काँग्रेसचीच काम करतील अशी शक्यता वर्तविण्यात येते आहे. कारण शिवसेनेत प्रवेश करताच त्यांनी शिवसेनेकडून आमदारकीसाठी शब्द टाकला होता.

दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे विद्यमान स्थानिक नगरसेवक मुरजी पटेल यांना या मतदारसंघातील आमदारकीच तिकीट निश्चित असलं तरी इथला भाजप विरोधी अल्पसंख्यांक समाज लोकसभेनंतर आयत्यावेळी काँग्रेसकडे एकगठ्ठा वळण्याची दाट शक्यता आहे. मुरजी पटेल यांची सेवाभावी संस्था जीवन ज्योत प्रतिष्ठानने केलेली जनसेवेची कामं मुरजी पटेल यांच्या पथ्यावर पडतील, परंतु या मतदारसंघातील मातब्बर नेते आयत्यावेळी काय राजकारण खेळतील याची आतातरी शास्वती देता येणार नाही. उद्या लोकसभेनंतर इथला मोठ्या प्रमाणावर असलेला मुस्लिम, ख्रिश्चन, बहुजन समाज आणि उत्तर भारतीय समाज आयत्यावेळी काँग्रेसकडे एकगठ्ठा फिरू शकतो अशी सुद्धा शक्यता आहे. त्यामुळे भविष्यात उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या अंधेरी पूर्व या विधानसभा क्षेत्रात लोकसभेनंतर वेगाने घडामोडी घडताना दिसतील असे राजकीय विश्लेषकांना वाटते.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x