1 May 2024 5:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

Credit Card Repayment | तुम्ही क्रेडिट कार्डच्या कर्जाच्या जाळ्यात अडकला असाल तर नो टेन्शन, हा मार्ग अवलंबून समस्या दूर करा

Credit card Repayment

Credit Card Repayment | आजकाल अनेक ई-कॉमर्स साइट्स ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऑफर आणि डिस्काउंट आणत असतात. या सणाच्या ऑफर्समध्ये आणि विशेष प्रसंगी, कंपनी क्रेडिट कार्डवरून खरेदीकरण्यावर विशेष सवलत आणि ऑफर देते. या ऑफर मिळविण्यासाठी, आपण ते क्रेडिट कार्डे खरेदी करतो. अनेक वेळा लहान ते मोठ्या वस्तूंच्या खरेदीवर आपण नकळत खूप खर्च करतो. मग क्रेडिट कार्डचे बिल भरण्याच्या वेळी आली की आपल्याला अनेक समस्यांना तोंड सामोरे जावे लागते. जर तुम्ही अशा क्रेडिट कार्डच्या कर्जात अडकले असाल तर घाबरू नका, त्यातून बाहेर एक भन्नाट मार्ग आहे.

पेमेंट धोरण :
क्रेडिट कार्ड च्या कर्जातून मुक्त होण्यासाठी आपले क्रेडिट कार्ड बिल पेमेंट धोरण तयार करा. जर तुम्हाला क्रेडिट कार्डच्या कर्जामधून मुक्ती मिळवायची असेल, तर तुम्हाला बिल वेळेवर भरण्याची एक योग्य रणनीती बनवावी लागेल, यासाठी तुम्हाला फक्त चार गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.

* जर तुमची मासिक बचत होत असेल, तर तुम्ही देय असलेल्या किमान रकमेपेक्षा जास्त रक्कम भरावी. त्यामुळे कर्जावरील व्याज कमी होईल.
* “डेट स्लोबॉल” या धोरणानुसार कर्ज फेडा. म्हणजे तुम्ही आधी लहान कर्ज कधीही आधी फेडले पाहिजे.
* तुमची कर्ज मर्यादा वैयक्तिक कर्जात रूपांतरित करा आणि ती सुलभ हप्त्यांमध्ये परतफेड करा.
* क्रेडिट कार्ड पेमेंट वेळेवर भरणे विसरू नका, म्हणून तुम्ही ऑटो पेमेंट सेट केले पाहिजे.

सर्व क्रेडिट कार्ड कर्ज एका खात्यात आणा :
जर अमजा तुमच्याकडे एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्डची कर्जे थकबाकी असल्यास,ते सर्व कर्जे एकाच खात्यात आणल्यास, तुमच्यासाठी एक खात्यातून कर्ज फेडणे सोपे होईल, आणि वेळेवर बिल भरले जाईल.

तुम्ही ज्या बँकेतून क्रेडिट कार्ड घेतले आहे त्या बँकेशी सल्लामसलत करा. क्रेडिट कार्डचे कर्ज टाळण्यासाठी तुम्ही काही महत्त्वाची पावले उचलू शकता. यासाठी तुम्हाला क्रेडिट कार्ड जारी करणाऱ्या बँकेशी बोलून तुमच्या समस्या सांगावे लागतील.बँक सोबत चर्चा केल्याने तुम्हाला पेमेंट अटींमधून थोडीफार सूट मिळू शकते. क्रेडिट कार्ड पेमेंट बिल जास्त असल्यास, अनेक बँकां आपल्या एकदा सोपा मार्ग सुचवू शकतात. बँका तुम्हाला थोडी सुट देऊ शकतात.

कमी खर्च करा :
जर तुमचे क्रेडिट कार्डचे बिल खूप जास्त असेल आणि तुम्हाला ते भरणे अवघड जात असेल तर तुम्ही तुमचे खर्च आणखी कमी केले पाहिजे. तुमचा पगार मिळताच तुमच्या क्रेडिट कार्डचे बिल भरणे ही पहिली प्राथमिकता असली पाहिजे. जेणेकरून तुमचे कर्ज लवकर फिटेल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Credit card Repayment on time and Decrease loan on 22 August 2022.

हॅशटॅग्स

#Credit Card Repayment(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x