9 May 2024 2:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

HDFC Mutual Fund | एचडीएफसीने नवीन म्युच्युअल फंड लाँच केला, फक्त 500 रुपये गुंतवणुकीतून मोठा परतावा मिळू शकतो, अधिक जाणून घ्या

HDFC mutual fund

HDFC Mutual Fund | HDFC म्युच्युअल फंडाने आपल्या ग्राहकांसाठी HDFC सिल्व्हर ETF फंड लाँच केले आहे. गुंतवणूकदारांना चांदीमध्ये डिजिटल पद्धतीने गुंतवणूक करण्यास प्रोत्साहित देण्यासाठी HDFC फंड हाऊसने ही जबरदस्त योजना सुरू केली आहे.

नवीन फंड ऑफर :
HDFC म्युच्युअल फंडाने HDFC सिल्व्हर ईटीएफ फंड सुरू केला असून आपल्या ग्राहक आणि गुंतवणूकदारांना चांदीमध्ये डिजिटल पद्धतीने गुंतवणूक करण्याची संधी या फंड हाऊसने दिली आहे. हा एक ओपन-एंडेड एक्सचेंज ट्रेडेड फंड असून चांदिमध्ये गुंतवणूक करतो.18 ऑगस्ट 2022 रोजी ह्या योजनेची सुरुवात करण्यात आली होती आणि ही योजना सदस्यत्वासाठी अर्ज नोंदणी सध्या चालू आहे. आणि ही योजना गुंतवणुकीसाठी 26 ऑगस्ट 2022 रोजी बंद होईल.

एचडीएफसी सिल्व्हर ईटीएफ फंड लॉन्च करताना एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनीचे म्हणणे होते की, “एचडीएफसी एएमसीने नेहमीच आपल्या गुंतवणूकदारांचा प्राथमिकता दिली आहे. हा ETF फंड आपल्या गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या जोखीम-परतावा असलेल्या धातूंमध्ये डिजिटल पद्धतीने गुंतवणूक करून पोर्टफोलिओची विविधता राखण्यास मदत करेल.

पोर्टेबल उपकरणे, औद्योगिक उपकरणे, इलेक्ट्रिक वाहने, गतिशीलता, ऊर्जा निर्मिती आणि दूरसंचार यांसारख्या औद्योगिक क्रिया प्रकल्पमधील उपयुक्ततेमुळे हा फंड गगुंतवणूकदारांना चांदीमध्ये गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देत आहे. या फंडातील गुंतवणूक मुख्यतः 0.999 टक्के शुद्धता असलेल्या चांदिमध्ये केली जाते. एचडीएफसी अॅसेट मॅनेजमेंट कंपनी लिमिटेड ही भारतातील आघाडीच्या म्युच्युअल फंड कंपनीपैकी एक आहे. या म्युचुअल फंड ची एकूण मालमत्ता अंतर्गत व्यवस्थापन 4.15 लाख कोटी रुपये नोंदवण्यात आली आहे.

किमान गुंतवणूक :
एचडीएफसी सिल्व्हर ईटीएफमध्ये किमान गुंतवणूक करण्यासाठी किंमत 500 रुपयांची गुंतवणूक करावी लागेल. या म्युचुअल फंडची बेंचमार्क गुंतवणूक देशांतर्गत बाजारभावात मिळणाऱ्या चांदीमध्ये आहे. या म्युचुअल फंडाचे चांदीमधील गुंतवणुकीचे उद्दिष्ट म्हणजे देशांतर्गत बाजारातील चांदीच्या किमतींशी सुसंगत परतावा कमावणे हा आहे. चांदी विकत घेऊन त्यात गुंतवणूक करणे आणि ते सुरक्षित ठेवणे आपल्यासाठी थोडे कठीण असू शकते. अशा परिस्थितीत, एचडीएफसी सिल्व्हर ईटीएफ एनएफओ या योजनेच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना चांदिमध्ये डिजिटल गुंतवणूक करण्याची आणि चांदी विकत घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या सिल्व्हर म्युचुअल फंड मध्ये बाजारातील ट्रेडिंग चालू असताना सहज करता येते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HDFC silver ETF mutual fund investments for huge return on 23 August 2022.

हॅशटॅग्स

HDFC mutual fund(30)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x