6 May 2024 5:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Port Share Price | कंपनीकडून एक बातमी आली अदानी पोर्ट्स शेअर्स सुसाट वाढीचे संकेत मिळाले, फायदा घेणार? Rhetan TMT Share Price | 12 रुपयाचा शेअर श्रीमंत करेल, 2 दिवसात दिला 30 टक्के परतावा, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 07 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया शेअर घसरून 12 रुपयांवर, तज्ज्ञांचा मोठा इशारा, फायदा की नुकसान? Gold Rate Today | बापरे! आज सोन्याचा भाव महाग झाला, मुंबई-पुणे सह तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या IPO GMP | सुवर्ण संधी! मालामाल करणारा IPO लाँच होतोय, पहिल्याच दिवशी मिळेल मल्टिबॅगर परतावा? Alok Industries Share Price | शेअर प्राईस 26 रुपये! कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा, आता गुंतवणूकदारांची चिंता वाढणार?
x

Mutual Funds | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करा पण डोळे बंद करून नव्हे, त्यासाठी या संभाव्य गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

Mutual funds|

Mutual Funds| पैसे कमावल्यानंतर लोकांना कुठे तरी गुंतवणूक किंवा बचत करायची असते. मात्र, अनेक वेळा गुंतवणुकीची माहिती किंवा ज्ञान नसल्यामुळे लोक चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करतात आणि अडकतात, ज्यामुळे त्यांना नंतर जबरदस्त नुकसान सहन करावे लागते.

म्युच्युअल फंड गुंतवणूक:
लोक पैसे कमावण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करतात. त्याच वेळी, पैसे कमावल्यानंतर, लोकांना ते योग्य ठिकाणी गुंतवायचे असते पण ज्ञान नसल्यामुळे आणि माहिती नसल्यामुळे चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक करतात आणि पैसे अडकवून बसतात. गुंतवणुकीसाठी अनेक माध्यमे आहेत. यातील काही गुंतवणुक जोखमीच्या असतात तर काही सुरक्षित परतावा देणाऱ्या गुंतवणूकही असतात. त्याचबरोबर म्युच्युअल फंडालाही धोकादायक गुंतवणुक मानले जाते. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन असते. अनेक गुंतवणूकदार म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणूक करतात परंतु त्यांना त्यातील नुकसान आणि फायदे माहित नसतात. अशा परिस्थितीत, म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीच्या तोट्यांबद्दल देखील जाणून घेणे खूप गरजेचे आहे.

शेअर बाजारात गुंतवणूक करणे जोखमी मानले जाते, तसेच म्युच्युअल फंड देखील शेअर बाजाराशीच जोडलेले असतात, म्हणून ते देखील जोखमीचे मानले जाते. यामध्ये एक फंड तयार करून काही स्टॉक मध्ये गुंतवणूक केली जाते आणि त्यातून परतावा कमावला जातो. म्युच्युअल फंडाचे अनेक फायदे असले तरी त्याचे काही तोटे देखील आहेत. अशा वेळी यातील तोट्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका. या नुकसानीकडे लक्ष न दिल्यास शेवटी तुम्हाला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागू शकते किंवा पैसे गमवावे लागू शकतात. हे टाळण्यासाठी प्रत्येक गोष्टीची माहिती आणि काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

म्युच्युअल फंडांचे तोटे खालीलप्रमाणे :
* परताव्याची खात्री नसते.
* म्युच्युअल फंडाची जास्त किंमत
* एक्झिट लोड, म्युचुअल फंड मधून बाहेर पाडण्यावर दंड लावला जातो.
* लॉक इन कालावधी.
* परताव्यावर कर आकारला जातो
* निधीवर नियंत्रण नसतो.
* थेट गुंतवणुकीमुळे नुकसान होण्याची भीती.
* योजना निवडण्यात चूक

अशा परिस्थितीत, कोणत्याही म्युच्युअल फंडात डोळे बंद करून गुंतवणूक केल्यास नुकसान तर होणारच. म्युच्युअल फंडाचे तोटे जाणून घेऊन तसेच तुमची गरज समजून घेऊन, तुम्ही गुंतवणूक करायला पाहिजे जेणेकरून म्युचुअल फंड मधील नुकसान टाळता येईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Mutual funds Investment returns on 24 August 2022.

हॅशटॅग्स

#Mutual Funds(42)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x