21 May 2024 1:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | कमाईची संधी सोडू नका! Infosys आणि TCS सहित हे 7 शेअर्स मजबूत परतावा देणार Hot Stocks | पैशाचा पाऊस पाडणारे 9 स्वस्त पेनी शेअर्स, अवघ्या 5 दिवसात 82 टक्केपर्यंत परतावा मिळतोय Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल मजबूत परतावा Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड सहित हे 4 शेअर्स मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, संधी सोडू नका Home Loan Down Payment | पगारदारांनो! गृहकर्जासाठी डाऊन पेमेंटची रक्कम सहज मॅनेज होईल, फॉलो करा या टिप्स My EPF Money | नोकरदारांनो! कठीण काळात तुमचे EPF चे पैसे डुबतील, नियम बदलला, कुटुंबालाही कल्पना देऊन ठेवा Demat Account | शेअर्स गुंतवणूकदारांसाठी अलर्ट, ट्रान्झॅक्शन चार्जेससहित डीमॅट खात्याशी संबंधित नियमात बदल
x

Tata Tiago EV | टाटा मोटर्सची टियागो ईव्ही हॅचबॅक लाँच होण्यास सज्ज, किंमत, फीचर्स आणि तपशील जाणून घ्या

Tata Tiago EV Hatchback

Tata Tiago EV | टाटा मोटर्स या महिन्याच्या अखेरीस आपली कार टियागो (टियागो ईव्ही) चे इलेक्ट्रिक व्हर्जन लाँच करणार आहे. टाटा मोटर्सने शुक्रवारी, ९ सप्टेंबर रोजी जागतिक इलेक्ट्रिक व्हेइकल डेच्या निमित्ताने ही माहिती दिली आहे. येत्या काही आठवड्यात टियागो ईव्हीची किंमत आणि इतर महत्त्वाची माहिती जाहीर करण्याचाही कंपनीचा विचार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतातील पहिली इलेक्ट्रिक हॅचबॅक टियागो ईव्हीची किंमत 12.5 लाख रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. टियागो ईव्ही एकदा पूर्ण चार्ज झाल्यानंतर २५० किलोमीटरचे मायलेज देईल, असे सांगण्यात येत आहे.

नेक्सॉन ईव्ही आणि टिगोर ईव्ही इलेक्ट्रिक मॉडेल्सनंतर आता टियागो ईव्ही हे टाटा मोटर्सचे तिसरे इलेक्ट्रिक वाहन असणार आहे. टाटा मोटर्सने पुढील 5 वर्षात 10 इलेक्ट्रिक व्हेईकल मॉडेल सादर करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकलचे (टीएएमपीव्ही) व्यवस्थापकीय संचालक शैलेश चंद्रा म्हणाले, ‘आमच्यासाठी आजची संधी महत्त्वाची आहे. आम्ही टियागो ईव्हीसह आमच्या ईव्ही विभागाच्या विस्ताराची घोषणा करतो.

कंपनीने निवेदनात काय म्हटले :
कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे की, आम्हाला भारताला जगातील इलेक्ट्रिक व्हेइकल हब बनवायचे आहे. टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटीने (टीपीईएम) टीपीजी राइज क्लायमेटच्या सहकार्याने एक नवीन मोबिलिटी सोल्यूशन सादर केले आहे, असे कंपनीने म्हटले आहे. ज्याचा मुख्य उद्देश ग्रीन राइड्सला प्रोत्साहन देणे हा आहे. तसेच, सरकारचे स्वप्न साकार करावे लागणार आहे. सन २०३० पर्यंत देशातील रस्त्यांवर धावणाऱ्या वाहनांपैकी ३० टक्के वाहने ही इलेक्ट्रिक वाहने असावीत, अशी केंद्र सरकारची इच्छा आहे.

टीएमपीव्हीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणाले की, टाटा मोटर्स भारताच्या ईव्ही मार्केटमध्ये महत्वाची भूमिका बजावत आहे याचा आम्हाला अभिमान आहे. ईव्ही बाजारात टाटा मोटर्सचा वाटा ८८ टक्के आहे. कंपनीने नेक्सॉन ईव्ही आणि टिगोर ईव्ही कारने या बाजारात सुरुवात केली. सध्या देशातील रस्त्यांवर 40 हजारांहून अधिक टाटा ईव्ही धावत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Tata Tiago EV hatchback is ready to launch check price details 10 September 2022.

हॅशटॅग्स

#Tata Tiago EV Hatchback(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x