5 May 2024 10:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Mutual Fund Schemes | या टॉप 5 म्युचुअल फंड योजना नोट करून ठेवा, फक्त 3 वर्षात 100 टक्के परतावा, तुमचा पैसाही वेगाने वाढवा

Mutual funds

Mutual Fund Schemes | शेअर बाजारात अस्थिरता आणि विक्रीचा दबाव असूनही म्युच्युअल फंड सातत्याने आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळवून देत आहे. गुंतवणूक बाजारात असे अनेक म्युचुअल फंड आहेत, ज्यांनी मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पट परतवा मिळवून दिला आहे. गुंतवणूकदारांनी म्युचुअल मध्ये अशीच नियमित गुंतवणूक चालू ठेवली तर त्यांना पुढील येणाऱ्या काळात जबरदस्त परतावा मिळू शकतो. चला तर जाणून घेऊ, कोणते म्युच्युअल फंड सातत्याने भरघोस परतावा मिळवून देत आहेत?

पराग पारीख फ्लेक्सी कॅप म्युचुअल फंड :
पराग पारिख फ्लेक्सी कॅप म्युचुअल फंड योजना आपल्या गुंतवणूकदारांना सातत्याने भरघोस परतावा देत आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी वार्षिक 25.72 टक्के परतावा मिळवून दिला आहे. मागील पाच वर्षांत या म्युचुअल फंडने दिलेला एकूण सरासरी वार्षिक परतावा 18.40 टक्के होता. जर तुम्ही या म्युच्युअल फंडात तीन वर्षांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2 लाख रुपये झाले असते. दुसरीकडे, जर तुम्ही ही गुंतवणूक पाच वर्षांपूर्वी केली असती, तर तुम्हाला एक लाखावर सध्या 2.32 लाख रुपये परतावा मिळाला असता.

IIFL फोकस्ड इक्विटी म्युचुअल फंड :
IIFL फोकस्ड इक्विटी म्युचुअल फंड योजनेने आपल्या गुंतवणूकदारांना खुश केले आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील तीन वर्षांत सरासरी 23.78 टक्के परतावा मिळवून दिला आहे. तर मागील पाच वर्षांत एकूण सरासरी वार्षिक परतावा 16.83 टक्के पेक्षा अधिक होता. या म्युच्युअल फंडात तीन वर्षांपूर्वी जर तुम्ही 1 लाख रुपये गुंतवले असते, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.91 लाख रुपये झाले असते. दुसरीकडे, जर तुम्ही पाच वर्षांपूर्वी गुंतवणूक केली असती, तर सध्या तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.19 लाख रुपये झाले असते.

पीजीआयएम इंडिया फ्लेक्सी कॅप म्युचुअल फंड :
पीजीआयएम इंडिया फ्लेक्सी कॅप म्युचुअल फंड योजनेने सातत्याने चांगला परतावा देऊन आपल्या गुंतवणूकदारांची संपत्ती वाढवली आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील तीन वर्षांत सरासरी 28.09 टक्केचा परतावा मिळवून दिला आहे. मागील पाच वर्षांत या म्युचुअल फंडने 16.79 टक्केचा सरासरी वार्षिक परतावा मिळवून दिला आहे. जी तुम्ही या म्युच्युअल फंडात तीन वर्षांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते, तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.10 लाख रुपये झाले असते. दुसरीकडे, जर तुम्ही पाच वर्षांपूर्वी गुंतवणूक केली असती, तर तुम्हाला 2.18 लाख रुपयेचा परतावा झाला असता.

मिरे अॅसेट इमर्जिंग ब्लूचिप म्युचुअल फंड :
मिरे अॅसेट इमर्जिंग ब्लूचिप योजनेने कमालीचा नफा कमावला आहे. या म्युचुअल फंड योजनेने मागील तीन वर्षांत लोकांना सरासरी 23.84 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील पाच वर्षांचा सरासरी वार्षिक परतावा 15.92 टक्के होता. जर तुम्ही या म्युच्युअल फंडात तीन वर्षांपूर्वी 1 लाख रुपये गुंतवले असते, तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य सध्या 1.90 लाख रुपये झाले असते. जर ही गुंतवणूक तुम्ही पाच वर्षांपूर्वी केली असती,तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 2.09 लाख रुपये झाले असते.

एसबीआय कॉन्ट्रा म्युचुअल फंड :
एसबीआय कॉन्ट्रा म्युचुअल फंड स्कीमने मागील काही वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा कमावून दिला आहे. या म्युचुअल योजनेने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना सरासरी 31.47 टक्केचा परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांत या म्युचुअल फंडने लोकांना सरासरी वार्षिक परतावा 15.74 टक्केचा परतावा दिला आहे. जर तुम्ही तीन वर्षांपूर्वी या म्युचुअल फंडात 1 लाख रुपये टाकले असते, तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.30 लाख रुपये झाले असते. जर पाच वर्षांपूर्वी तुम्ही ही गुंतवणूक केली असती, तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य आज 2.08 लाख रुपये झाले असते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Top Five Mutual funds for higher return on investment in short term on 23 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x