26 April 2024 4:17 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर Gold Rate Today Pune | बापरे! आज सोन्याचा भाव मजबूत वाढला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Hot Stocks | असा शेअर निवडा, कुबेर पावेल! अवघ्या 6 दिवसात दिला 80 टक्के परतावा, खरेदी करणार का? Suzlon Share Price | 1 वर्षात 413% परतावा देणाऱ्या सुझलॉन शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, तज्ज्ञांनी काय म्हटले? Penny Stocks | 3 रुपये ते 9 रुपये किंमतीच्या स्वस्त 10 पेनी शेअर्सची यादी सेव्ह करा, अल्पावधीत मालामाल होऊन जाणार
x

शिंदे पिता-पुत्राचे फोटो हटवले म्हणून महिला शिवसैनिकावर लगेच देशद्रोहाचा गुन्हा | पण PFI आंदोलकांवर इतका उशीर का?

PFI Protest Pakistan Zindabad Slogans

PFI Protest Pakistan Zindabad Slogans | पुण्यात पीएफआयच्या आंदोलनतील पाकिस्तान जिंदाबाद घोषणेचा मुद्दा चांगलाच तापू लागलाय. पीएफआयच्या आंदोलनाच्या आयोजकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बंडगार्डन पोलिसांनी आरोपींविरोधातली कलमं वाढवली आहेत. युवासेना (शिवसेना), मनसे आणि भाजपने या आरोपींवर देशद्रोहाची कलमं लावण्याची मागणी केली होती. काल पुणे तळेगाव येथील मोर्चात देखील आदित्य ठाकरे यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना यावर लगेच कारवाई होणं अपेक्षित असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे युवासेना देखील पुण्यात आंदोलनात उतरली होती आणि पोलिसांवर सर्वच बाजूने राजकीय दबाव वाढला होता. मात्र एवढं घडूनही शिंदे सरकारने इतका उशीर का केला याची चर्चा रंगली आहे.

पाकिस्तान जिंदाबाद नाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलिसांनी आता याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. बंडगार्डन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातच याविषयीचे कलम ऍड करण्यात आलं आहे. कलम 153, 124, 109, 120 ब ही आरोपींविरुद्ध नव्याने ऍड करण्यात आली आहेत.

दरम्यान, ४ ऑगस्ट २०२२ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे डोंबिवली मध्यवर्ती शाखेतील खासदार कार्यालयातून हटवलेले फोटो पुन्हा लावण्यासाठी शिंदे समर्थकांनी धडक देत धक्काबुक्की करत गोंधळ घातला होता. यावेळी शाखेत शिंदे समर्थकांना विरोध करणाऱ्या महिला विधानसभा संघटक कविता गावंड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात अपशब्दाचा वापर करत त्यांना उद्देशून शिवीगाळ केली होती. या प्रकरणी रामनगर पोलिसांनी गावंड यांच्या विरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता. विशेष म्हणजे ही कारवाई अत्यंत वेगाने करण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे खासदार पुत्र प्रेमापोटी अत्यंत आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्यामुळे आपल्या मुलाच्या मतदारसंघात त्यांनी कोणताही धोका पत्करायला नको नको शिवसैनिकांवर अत्यंत कडक गुन्हे दाखल केले होते.

डोंबिवली मध्यवर्ती शाखेतच खासदार डॉ शिंदे यांचे देखील कार्यालय आहे. मात्र शिंदे यांच्या बंडानंतर ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी खासदार कार्यालयातील शिंदे पिता-पुत्राचे फोटो हटवून शिंदे समर्थकांना शाखेत येण्यास प्रतिबंध केला होता. मात्र शिंदे समर्थक कार्यकर्ते मोठ्या संख्येने शाखेत शिरले, त्यांनी शिंदे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करत शिंदे यांचे हटवलेले फोटो पुन्हा भिंतीवर लावले. यावेळी शाखेत उपस्थित असलेल्या ठाकरे समर्थक आणि शिंदे समर्थकामध्ये धक्काबुक्की आणि हाणामारी झाली होती. मात्र पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: PFI Protest Pakistan Zindabad Slogans issue check details 25 September 2022.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x