28 April 2024 1:45 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
FD Interest Rate | पैशाने पैसा वाढवा! 1 वर्षाच्या FD वर या 3 बँक देत आहेत 7.75 टक्केपर्यंत व्याज, यादी सेव्ह करा HDFC Credit Card | तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे? मग या 5 चुका टाळा, अन्यथा आर्थिक ट्रॅपमध्ये अडकाल Property Knowledge | फ्लॅट किंवा घर विकत घेण्याचा विचार आहे? या 4 गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा पैसे-प्रॉपर्टी हातचं जाईल EDLI Calculation | नोकरदार EPFO सदस्यांना मिळतो 7 लाखांपर्यंत मोफत इन्शुरन्स, महत्त्वाचे फायदे लक्षात ठेवा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार? SBI CIBIL Score | पगारदारांनो! 'या' चुकांमुळे तुमचा सिबिल स्कोअर खराब होतो, अशा प्रकारे वाढवा क्रेडिट स्कोअर Personal Loan | पर्सनल लोन फेडता येत नसेल तर काळजी करू नका, करा हे काम, टेन्शन संपेल
x

Pimple Instant Cure Tips | महत्वाच्या कार्यक्रमात जायचंय आणि चेहऱ्यावर मुरुम, या 5 घरगुती पद्धतीने चेहऱ्यावरील मुरुम दूर करा

Pimple Instant Cure Tips

Pimple Instant Cure Tips | कुणाचा चेहरा तेलकट असतो तर कुणाच्या चेहऱ्यावर मुरुम असतो. मात्र या गोष्टी नैसर्गिक आणि सामान्य आहेत. त्यामागे अनेक कारणे असू शकतात. हार्मोनल चेंजेस आणि आहाराच्या कमतरतेमुळे त्वचेवर मुरुम देखील सुरू होतात. दरम्यान, शरीरावर कुठेही मुरुम दिसू शकतात आणि एकदा मुरुम दिसला की, तुमचे लक्ष ते दूर करण्यावर असते. विशेषत: जर ते एखाद्या विशेष कार्यक्रमापूर्वी तुमच्या चेहऱ्यावर येते. यासोबतच या पिंपलमुळे होणाऱ्या वेदना आणि खाजही त्रास देते. जर तुम्हालाही मुरुमांचा त्रास होत असेल तर चला जाणून घेऊया यापासून लवकर सुटका कशी करावी.

मुरुम रातोरात गायब होईल :
रोज रात्री झोपण्यापूर्वी त्वचेची काळजी घ्या. प्रथम क्लीन्सरने त्वचा स्वच्छ करून घ्या, नंतर टोनर लावा व चेहरा मॉइश्चरायझ करून घ्या. यानंतर, ज्या ठिकाणी मुरुम झाला आहे त्या ठिकाणी कोणतेही बाम लावा. होय, तोच बाम जो तुम्हाला सर्दी-खोकला झाल्या नंतर लावता. हा बाम पिंपल्सवर लावा आणि एक मिनिट हलका मसाज करा. त्यानंतर झोप घ्या. असे केल्याने पिंपल्सचा त्रास कमी होतो, तसेच मुरुम सकाळपर्यंत कोरडे होतात. पिंपल्सवर पांढरी टूथपेस्ट लावून घ्या आणि सोडा. लक्षात ठेवा की हे जेल टूथपेस्ट नाहीये. तुमच्या पिंपलची सूज रात्रभरामध्ये नाहीशी होईल.

घरीच करा मुरुमांवर उपाय :
जर तुम्हाला मुरुमांपासून त्वरित आराम हवा असेल तर त्यावर हळद लावा व यासाठी चिमूटभर हळदीमध्ये गुलाबपाणी मिसळून घट्ट पेस्ट तयार करून घ्या आणि पिंपल्सवर लावा व झोपी जा. सकाळपर्यंत तुमचा पिंपल पूर्णपणे पिकून त्याची नखे बाहेर येईल. पिंपल जास्त दुखत असेल किंवा जळजळ होत असेल तर त्यावर बर्फ लावा व यामुळे मुरुमांभोवतीची घाण आणि तेल साफ होते. सुती कापडात गुंडाळलेला बर्फ लावून घ्या. रात्रभर मुरुमांची सूज कमी करायची असेल तर त्यावर लसणाचा रस लावा. सकाळपर्यंत, तुम्हाला मुरुमांची सूज कमी झालेली दिसेल आणि यासाठी लसणाची एक कढी घ्या आणि अर्धी कापून घ्या. आता ते पिंपल्सवर हलकेच चोळा. मग झोपायला जा आणि सकाळी उठल्यावर चेहरा धुवा.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Pimple Instant Cure Tips Checks details 11 October 2022

हॅशटॅग्स

Pimple Instant Cure Tips(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x