15 May 2024 7:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

Multibagger Stocks | 606 टक्के परतावा आणि आता राइट्स इश्यू, हा शेअर स्वस्तात मिळतोय, विकत घ्यावा का?

Multibagger stock

Multibagger Stocks | स्मॉल कॅप कंपनीचं गणित थोडं वेगळं असतं. स्मॉल कंपनीचे शेअर्स तेजीत आले की गुंतवणूकदारांना करोडपती बनवण्याची क्षमता ठेवतात. असाच एक स्मॉल कॅप स्टॉक शेअर बाजारात ट्रेड करत आहे, ज्यात गुंतवणूकीची भारी संधी आली आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल माहिती घेत आहेत त्याचे नाव आहे,”सुवेन लाईफ सायन्सेस”. ही एक स्मॉल कॅप कंपनी असून तिचे बाजार भांडवल 1,028.58 कोटी रुपये आहे. या कंपनीचे शेअर्स सध्या स्वस्त दरात उपलब्ध झाले आहेत. शेअर बाजाराच्या सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, या कंपनीने आपले राइट्स इश्यू जारी केले आहेत. यासाठी कंपनीने 12 ऑक्टोबर ही रेकॉर्ड तारीख निश्चित केली आहे. चला तर मग जाणून घेऊ स्टॉकच्या कामगिरीसह राइट इश्यूचे सर्व तपशील

कंपनीने स्टॉक एक्सचेंजला नुकताच दिलेल्या माहितीत स्पष्ट केले आहे की, 12 ऑक्टोबर 2022 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली होती. बैठकीत गुंतवणूकदारांना 2 शेअर्सवर आणखी एक शेअर खरेदी करण्याची संधी मिळेल. कंपनीच्या वतीने, 18 ऑक्टोबर 2022 ही तारीख राइट्स इश्यूसाठी रेकॉर्ड डेट म्हणून निर्धारित केली आहे. म्हणजेच या तारखेपर्यंत ज्या गुंतवणूकदाराकडे कंपनीचे 2 शेअर्स असतील त्यांना आणखी एक 1 शेअर खरेदी करण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल.

शेअर्सची कामगिरी :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सुवेन लाईफ सायन्सेस कंपनीचा स्टॉक 0.57 टक्क्यांच्या वाढीसह 70.57 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील 19 वर्षात या कंपनीच्या शेअरची किमत 7,674.73 टक्क्यांनी वधारली आहे. 31 ऑक्टोबर 2003 रोजी या कंपनीचा शेअर 0.91 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.

जर तुम्ही 5 वर्षांपूर्वी या कंपनीचे शेअर्स खरेदी केले असते आणि आपली गुंतवणूक आजपर्यंत कायम ठेवली असती, तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 606.09 टक्क्यांनी वाढले असते. मात्र, मागील 3 वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 72.55 टक्क्यांनी खाली पडली आहे. जर एखाद्या गुंतवणूकदारांनी एक वर्षापूर्वी या कंपनीत गुंतवणूक केली असती, तर आज त्यांना 40.14 टक्क्यांचा तोटा झाला असता. 2022 मध्ये या स्मॉलकॅप कंपनीचे शेअर्स 20.51 टक्क्यांनी घसरले आहेत. जून 2022 पर्यंत, कंपनीमध्ये प्रोमोटर्स कडे एकूण 64.98 टक्के वाटा होता. परकीय गुंतवणूकदारांची भागीदारी 0.45 टक्के होती, आणि देशांतर्गत गुंतवणूकदारांची गुंतवणूक 0.39 टक्के आणि किरकोळ गुंतवणूकदारांची गुंतवणूक 34.18 टक्के होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger stock of Suven Life sciences share price return on investment on 14 October 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x