29 April 2024 8:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 30 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे मंगळवारचे राशिभविष्य | 30 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या DCB Bank Share Price | फायद्याचा बँकिंग शेअर! तज्ज्ञांनी दिली 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मिळेल 30 टक्के परतावा Bonus Shares | अशी संधी सोडू नका! फ्री शेअर्स मिळवा, या दोन कंपन्यांकडून फ्री बोनस शेअर्सची घोषणा Sterling and Wilson Share Price | रिलायन्स ग्रुपची गुंतवणूक असलेल्या शेअरने 1 महिन्यात दिला 32% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Ircon Share Price | सरकारी कंपनीच्या शेअरमधून मजबूत कमाई करा, तज्ज्ञांनी टार्गेट प्राईसहित दिली फायद्याची अपडेट Patel Engineering Share Price | स्वस्त पटेल इंजिनीअरिंग शेअरमध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राइस जाहीर, खरेदी करणार?
x

शिंदे समर्थक मंत्र्यांकडून आमदार बच्चू कडूंची खिल्ली उडविण्यास सुरुवात, फडणवीस आणि शिंदे समर्थक एकवटले?

Minister Abdul Sattar

MLA Bacchu Kadu | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आधी मंत्रीमंडळ विस्तार आणि त्यानंतर खातेवाटपाची जोरदार चर्चा झाली. यातून ज्यांना मंत्रीपद मिळालं नाही, त्यांच्या नाराजीचीही चर्चा झाली. यामध्ये सर्वात आघाडीवर नाव होतं ते म्हणजे प्रहारचे आमदार बच्चू कडू यांचं. बच्चू कडू यांनी आधीपासूनच आपल्याला कोणत्या खात्याचं मंत्रीपद हवं, याबाबत सूतोवाच केले होते.

काही दिवसांपूर्वी पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात त्यांच्या नावाचा समावेश न झाल्यामुळे त्यांनी नाराजी बोलून दाखवली होती. त्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी बच्चू कडूंच्या मंत्रीपदाबाबत मिश्किल टिप्पणी केली होती. माध्यमांशी बोलताना त्यांनी बच्चू कडू यांच्याविषयी मिश्किल भाष्य केलं. “ये मीठा है और वो कडू है”, असं अब्दुल सत्तार म्हणाले होते. त्यानंतर आता पुन्हा अब्दुल सत्तार यांनी अप्रत्यक्षरीत्या आमदार बच्चू कडू यांची खिल्ली उडवली आहे.

आमदार बच्चू कडू आणि भाजपचे समर्थक आमदार रवी राणा यांच्यातील वाद टोकाला पोहोचला आहे. रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केला होता. बच्चू कडूंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला पाठिंबा देण्यासाठी खोके घेतल्याचा आरोप केला होता. त्यानंतर संतापलेल्या बच्चू कडूंनी थेट पत्रकार परिषद घेत रवी राणा यांना 1 नोव्हेंबरपर्यंत खोके घेतल्याच्या आरोपांप्रकरणी पुरावे सादर करण्यास सांगितलं आहे. तसेच राणा यांनी पुरावे सादर न केल्यास आपण सरकारमधून बाहेर पडू, त्यासाठी सात ते आठ आमदार आपल्या संपर्कात असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

त्याच विषयाला अनुसरून राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कुणी कुणाच्या संपर्कात असतील तर त्यांनी पक्षप्रवेश द्यावा”, असं विधान अब्दुल सत्तार यांनी केलं आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेवर आता बच्चू कडू काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. अब्दुल सत्तार यांनी अप्रत्यक्षरीत्या बच्चू कडू यांची खिल्ली उडवल्याचं म्हटलं जातंय. तसेच फडणवीस आणि शिंदे समर्थक कडू यांच्या विरोधात एकवटले आहेत असं चित्र निर्माण झालं आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Minister Abdul Sattar indirectly criticized MLA Bacchu Kadu check details 27 October 2022.

हॅशटॅग्स

#Minister Abdul Sattar(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x