2 May 2024 5:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 02 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 02 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Trent Share Price | टाटा ग्रुपच्या शेअरने 6 महिन्यात दिला 110 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | मल्टिबॅगर एनएमडीसी शेअर एका महिन्यात बक्कळ कमाई करून देईल, फायदा घेणार? NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, तुमच्या शहरातील घसरलेले नवे दर तपासून घ्या Stocks To Buy | कमाईची मोठी संधी! अवघ्या 87 रुपये किमतीचा शेअर अल्पावधीत 30 टक्के परतावा देईल
x

Top Mutual Fund | बक्कळ पैसा पाहिजे? बंपर परतावा देणाऱ्या 4 SIP योजनांची लिस्ट सेव्ह करा, 3 वर्षांत मालामाल व्हाल

Top Mutual fund

Top Mutual Fund | सध्या जर तुम्ही म्युचुअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर चांगला परतावा मिळवण्यासाठी सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP हा एक उत्तम पर्याय राहील. म्युचुअल फंड एसआयपी मध्ये गुंतवणूक करून मागील काही वर्षांत लोकांनी जबरदस्त परतावा कमावला आहे. त्यामुळेच तरुणांमध्ये एसआयपी गुंतवणूक अधिक लोकप्रिय मानली जाते, याचे कारण म्हणजे कमी गुंतवणुक आणि जास्त परतावा. त्याच वेळी, SIP मध्ये गुंतवणूक करणे देखील सुरक्षित जाते, कारण यातील गुंतवणुकीचा तुमच्या खिशावर आर्थिक भार पडत नाही आणि तुम्ही दीर्घकाळात चांगला परतावा कमवू शकता.

1) ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी फंड :
ICICI प्रुडेन्शियल टेक्नॉलॉजी म्युचुअल फंडाने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 42.1 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंडाची एकूण मालमत्ता 6,887 कोटी रुपये नोंदवली गेली असून NAV म्हणजेच निव्वळ मालमत्ता मूल्य 163 रुपये आहे. स्टॉक रिसर्च फर्म क्रिसिलने या म्युचुअल फंडाला 3 स्टार रेटिंग दिले असून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या म्युचुअल फंडाच्या टॉप पाच होल्डिंग्समध्ये इन्फोसिस लिमिटेड, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, टेक महिंद्रा लिमिटेड, एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि पर्सिस्टंट सिस्टम्स लिमिटेड यांचा समावेश होतो.

2) टाटा डिजिटल इंडिया फंड :
टाटा डिजिटल इंडिया म्युचुअल फंडाने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 39.4 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंडाची एकूण मालमत्ता 3842 कोटी रुपये नोंदवली गेली असून NAV म्हणजेच निव्वळ मालमत्ता मूल्य 38.2 रुपये आहे. या म्युचुअल फंडाच्या खर्चाचे प्रमाण 2.02 टक्के आहे. यामध्ये तुम्ही किमान 500 रुपयांपासून SIP गुंतवणूक सुरू करू शकता. या म्युचुअल फंडाच्या टॉप होल्डिंग्समध्ये इन्फोसिस लिमिटेड, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड, टेक महिंद्रा लिमिटेड आणि भारती एअरटेल यांचा समावेश होतो.

3) आदित्य बिर्ला सन लाइफ डिजिटल इंडिया फंड :
आदित्य बिर्ला सन लाइफ डिजिटल इंडिया म्युचुअल फंडाने मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 40.5 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंडाची एकूण मालमत्ता 2658 कोटी रुपये नोंदवली गेली असून त्याचे NAV म्हणजे निव्वळ मालमत्ता मूल्य 140 रुपये आहे. या म्युचुअल फंडाच्या खर्चाचे प्रमाण 2.19 टक्के आहे. तुम्ही यामध्ये किमान 1000 रुपये पासून SIP गुंतवणूक सुरू करू शकता. या म्युचुअल फंडाच्या टॉप होल्डिंग्समध्ये इन्फोसिस लिमिटेड, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड, एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड, टेक महिंद्रा लिमिटेड आणि भारती एअरटेल यांचा समावेश होतो.

4) एसबीआय टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंड :
एसबीआय टेक्नॉलॉजी अपॉर्च्युनिटीज फंडाने आपल्या गुंतवणूकदारांना 36.6 टक्के परतावा कमावून दिला आहे. या म्युचुअल फंडाची एकूण मालमत्ता 1891 कोटी रुपये असून NAV म्हणजेच निव्वळ मालमत्ता मूल्य 156 रुपये आहे. तुम्ही या म्युचुअल फंडात किमान 500 रुपयांपासून एसआयपी गुंतवणूक करू शकता. या म्युचुअल फंडाचे खर्चाचे प्रमाण 2.27 टक्के आहे. या फंडाच्या टॉप होल्डिंगमध्ये इन्फोसिस लिमिटेड, एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड, अल्फाबेट इंक, टेक महिंद्रा लिमिटेड आणि भारती एअरटेल लिमिटेड यांचा समावेश होतो.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Top Mutual fund for investment and huge returns and benifits in Long term on 30 October 2022.

हॅशटॅग्स

Top Mutual fund(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x