7 May 2024 5:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 08 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Jindal Stainless Share Price | मल्टिबॅगर 307% परतावा देणारा स्टॉक 'खरेदी' करण्याचा सल्ला, अल्पावधीत 30% परतावा मिळेल BHEL Share Price | PSU BHEL स्टॉकवर ब्रेकआउट, तज्ज्ञांकडून मालामाल करणारी मजबूत टार्गेट प्राईस जाहीर Yes Bank Share Price | येस बँक स्टॉकचार्ट काय संकेत देतोय? या प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांचा इशारा काय? Post Office Interest Rate | पोस्ट ऑफिसची मजबूत परतावा देणारी योजना, बचतीवर रु.56,830 फक्त व्याज मिळेल SBI Mutual Fund | नोट छापायची मशीन आहे ही SBI म्युच्युअल फंड योजना, 5,000 च्या SIP वर 1.37 कोटी रुपये परतावा Waaree Renewables Share Price | 2 रुपयाच्या शेअरची कमाल! 4 वर्षात दिला 137000% परतावा, खरेदी करणार?
x

Multibagger Stocks | 5-7 टक्के नव्हे तर या शेअरने 570 टक्के पेक्षा अधिक परतावा दिला, हा शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदार उत्सुक

Multibagger Stocks

Multibagger Stocks | पॉवर इन्फ्रास्ट्रक्चर सोल्यूशन्स सेवा प्रदान करणारी अद्वैत इन्फ्राटेक कंपनीचे शेअर्स 28 ऑक्टोबर शुक्रवारच्या ट्रेडिंगमध्ये सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर पोहोचले होते. मागील एका महिन्यात या कंपनीच्या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 38 टक्के परतावा कमावून दिला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या स्टॉकमध्ये फक्त खरेदीदारच काउंटरमध्ये व्यवहार करत होते. कारण स्टॉकने 5 टक्के अप्पर सर्किटला स्पर्श केला होता आणि स्टॉक बीएसई निर्देशांकावर प्रति शेअर 648.55 रुपयये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. मागील एका वर्षात या कंपनीचे स्टॉक 570 टक्के पेक्षा अधिक मजबूत झाले आहे. या मल्टीबॅगर कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहेत, कारण कंपनी ग्रीन हायड्रोजन सेक्टरमध्ये आपला उद्योग विस्तार करत आहे.

कंपनीचा उद्योग आणि प्रकल्प :
अद्वैत इन्फ्राटेक कंपनीचा मुख्य उद्योग टर्नकी टेलिकम्युनिकेशन प्रकल्प, पॉवर ट्रान्समिशनची स्थापना, सबस्टेशन आणि दूरसंचार उत्पादने, संपर्क विपणन आणि ग्राहकांना एंड-टू-एंड सोल्यूशन्स सेवा प्रदान करणे हे आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना एंटरप्राइझ टेलिकम्युनिकेशन, सबस्टेशन आणि पॉवर ट्रान्समिशन इन्फ्रास्ट्रक्चरसाठी विश्वसनीय वस्तू आणि सेवा सुविधाही ऑफर करते. कंपनीने नुकताच शाश्वत, अत्याधुनिक, नाविन्यपूर्ण आणि एकात्मिक उर्जा पायाभूत सुविधा प्रदान करून भारताच्या ऊर्जा क्षेत्रात एक नवीन क्रांती घडवून आणण्याच्या भारत सरकारच्या उद्दिष्टांना मदत करण्याचे जाहीर केले आहे.

आर्थिक वर्ष 2022 मध्ये या कंपनीने ACS वायर, स्ट्रिंगिंग टूल्स, जॉइंट बॉक्स, ERS/इमर्जन्सी रिस्टोरेशन सिस्टीम आणि असेंबली युटिलिटी तयार करण्यासाठी एक उत्पादन केंद्र स्थापन केले आहे. स्थानिक बाजारपेठेत सेवा सुविधा देण्यासाठी स्थानिक पातळीवर टूल्स आणि जॉइंट बॉक्सेसची निर्मिती करण्यासाठी उत्पादन केंद्र सुरू केले आहेत. कंपनी ग्रीन हायड्रोजन आणि नूतनीकरणक्षम ऊर्जा सुविधा उभारण्याची तयारी करत असून नुकताच कंपनीने या क्षेत्रांमध्ये EPC प्रकल्प हाती घेण्याची एक नवीन योजना अमलात आणली आहे. कंपनीच्या प्रमुख ग्राहकांमध्ये केंद्रीय आणि राज्य विद्युत पारेषण कंपन्या, भारतातील EPC कंपन्या तसेच परदेशातील आणि सरकारी तसेच खाजगी वीज पारेषण ग्राहक यांचा समावेश होतो.

कंपनीला होणारा महत्त्वाचा फायदा असा आहे की, भारतातील प्रत्येक राज्य वीज वितरण नेटवर्कमध्ये जबरदस्त सुधारणा आणि विस्तार करत आहे, कारण विजेची मागणी वाढत आहे. आणि आता, कंपनी ग्रीन हायड्रोजनवर लक्ष केंद्रित करणार आहे. ग्रीन हायड्रोजनची निर्मिती स्वच्छ ऊर्जा स्रोत आणि कमी-कार्बन पॉवर वापरून तयार केली जाते. राखाडी हायड्रोजनपेक्षा ग्रीन हायड्रोजन खूप कमी कार्बन उत्सर्जन करते. जागतिक उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अद्वैत इन्फ्राटेक कंपनीने ग्रीन हायड्रोजन जनरेशन सिस्टीमसाठी सर्वसमावेशक सोल्यूशन्सचे इंटिग्रेटर बनण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून आपली उत्पादन क्षमता अनेक पटींनी वाढवली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Multibagger Stocks of Advait Infratech share price return on investment on 30 October 2022.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x