9 May 2024 11:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 10 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं?
x

PPF Calculator | सुपरहिट योजनेत 7500 रुपये गुंतवा आणि करोडमध्ये परतावा घ्या, योजना समजून घ्या

PPF Calculator

PPF Calculator| तुम्हाला जर सेवानिवृत्ती नंतर करोडपती व्हायचे असेल तर तुम्हाला आतापासूनच गुंतवणूक करायला हवी. भविष्यात जर तुम्हाला करोडपती व्हायचे असेल तर तुम्ही आजपासूनच गुंतवणूक सुरू करायला हवी. आम्ही तुम्हाला ज्या गुंतवणूक योजनेबद्दल माहिती देणार आहोत, त्यात तुम्हाला जास्त गुंतवणुक करायची गरज नाही. करोडपती होण्यासाठी तुम्हाला दर महिन्याला सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीमध्ये काही रुपये जमा करावे लागतील. नियमित गुंतवणूक करत राहिल्यास सेवानिवृत्तीपूर्वी तुम्ही करोडपती होऊ शकता.

दीर्घकालीन गुंतवणूक :
दीर्घकालीन गुंतवणुक करून चांगला परतावा मिळवण्यासाठी सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी म्हणजे PPF हा एक उत्तम गुंतवणूक पर्याय आहे. या योजनेत गुंतवणूक करून तुम्ही अप्रतिम परतावा कमवू शकता. PPF मध्ये तुम्ही एका वर्षात कमाल 1.5 लाख रुपये, म्हणजेच 12,500 रुपये प्रति महिना जमा करू शकता. करोडपती होण्यासाठी तुम्हाला दर महिन्याला किती गुंतवणूक करावी लागेल आणि किती काळासाठी करावी लागले याचा एक हिशोब करू.

PPF वर मिळतो 7.1 टक्के व्याज :
सध्या भारत सरकार PPF गुंतवणूक खात्यावर 7.1 टक्के दराने वार्षिक व्याज परतावा देते. या योजनेत तुम्ही कमाल 15 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. जर तुम्ही दर महिन्याला 12500 रुपयांची नियमित गुंतवणुक केली तर 15 वर्षांनी तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढून 40,68,209 रुपये होईल. यामध्ये एकूण तुमची प्रत्यक्ष गुंतवणूक केलेली रक्कम 22.5 लाख रुपये असेल, आणि त्यावर तुम्हाला मिळणारा व्याज परतावा 18,18,209 रुपये असेल.

एक कोटी रुपयांचा निधी जमा करण्यासाठी खालील हिशोब समजून घ्या : 

प्रकरण क्रमांक : 1
समजा तुमचे वय सध्या 30 वर्षे आहे आणि तुम्ही नुकताच PPF मध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली आहे. जर तुम्ही दर महिन्याला 12500 रुपये PPF मध्ये गुंतवणूक करत असाल तर 20 वर्षांनी तुमची एकूण गुंतवणूक 66,58,288 5 रुपये झाली असेल. त्यानंतर तुम्ही पुढील आणखी 5 वर्षांसाठी गुंतवणूक वाढववली तर 25 तुमची एकूण गुंतवणूक 1,03,08,015 रुपये होईल. म्हणजेच जर तुम्ही वयाच्या 30 व्या वर्षी PPF मध्ये दरमहा 12500 रुपये जमा करायला सुरुवात केली तर 25 वर्षांनी म्हणजेच तुम्ही जेव्हा 55 वर्षाचे व्हाल, तुम्ही करोडपती झालेला असाल. PPF गुंतवणूक खात्याची कमाल मॅच्युरिटी कालावधी 15 वर्षे निश्चित करण्यात आला आहे. जर हे खाते 15 वर्षांपेक्षा जास्त वाढवायचे असेल, तर तुम्ही तर पुढे दर पाच वर्षांसाठी वाढवू शकता.

प्रकरण क्रमांक : 2
जर तुम्हाला PPF मध्ये थोडी कमी रक्कम गुंतवून वयाच्या 55 व्या वर्षी करोडपती व्हायचे असेल तर तुम्हाला थोडे आधी गुंतवणुकीला सुरुवात करावी लागेल. समजा तुमचे वय 25 वर्ष असून तुम्ही PPF खात्यात दर महिन्याला 10,000 रुपये जमा करत असाल, तर 7.1 टक्के व्याज दरानुसार 15 वर्षांनंतर तुमच्या गुंतवणूकीचीएकूण मूल्य 32,54,567 रुपये असेल. आता तुम्हाला ही योजना आणखी 5 वर्षांसाठी वाढवावी लागेल. तर 20 वर्षांनी तुमच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य होईल 53,26,631 रुपये होईल. त्यानंतर पुन्हा 5 वर्षांसाठी तुम्हाला योजनेची मुदत वाढवावी लागेल. आणि 25 वर्षांनंतर तुमच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 82,46,412 रुपये झाले असेल. आणि आता पुन्हा एकदा योजनेची मुदत 5 वर्षांसाठी वाढवा, म्हणजेच 30 वर्षांनंतर तुमच्या गुंतवणुकीचे एकूण मूल्य 1,23,60,728 रुपये होईल. म्हणजेच वयाच्या 55 व्या वर्षी तुम्ही करोडपती व्हाल.

प्रकरण क्रमांक : 3
जर तुम्हाला 10,000 रुपये ऐवजी 7500 रुपये दरमहा गुंतवणूक करून वयाच्या 55 व्या वर्षी करोडपती व्हायचे असेल तर तुम्हाला वयाच्या 20 व्या वर्षीपासून PPF योजनेत गुंतवणूक करावी लागेल. जर तुम्ही PPF योजनेत 7500 रुपये 7.1 टक्के व्याजदराने 15 वर्षांसाठी जमा केले तर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 24,40,926 रुपये होईल. पुढील 5 वर्षानंतर, म्हणजेच 25 वर्षांनंतर तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 39,94,973 रुपये झाले असेल. आणखी 5 वर्षे मुदत वाढवल्यास तुमची गुंतवणूक रक्कम 61,84,809 रुपये होईल. आणखी 5 वर्षे मुदत पुढे केल्यावर 30 वर्षांनी तुमची गुंतवणूक रक्कम 92,70,546 रुपये होईल. आणखी 5 वर्ष मुदत वाढवल्यास 35 वर्षांनंतर तुमचे गुंतवणूक मूल्य 1,36,18,714 रुपये असेल. याचा अर्थ तुम्ही 55 व्या वर्षी करोडपती झालेला असाल. PPF मध्ये गुंतवणूक करोडपती होण्याची युक्ती म्हणजे PPF च्या गुंतवणुकीवर चक्रवाढ व्याज पद्धतीने परतावा मिळतो. त्यामुळे या योजनेत लवकर गुंतवणूक करणे फायद्याचे ठरते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| PPF Calculator for understanding the long term return in investment of PPF Scheme on 01 November 2022.

हॅशटॅग्स

#PPF Calculator(22)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x