26 April 2024 11:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Bonus Shares | खरेदी करा हा शेअर! फ्री बोनस शेअर्स सुद्धा मिळतील, शेअरने 6 महिन्यांत 210% परतावा दिला Post Office Interest Rate | होय! या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळतील 20000 रुपये, फायद्याचा मोठा व्याज दर SBI Mutual Fund | तज्ज्ञांनी सुचवल्या 5 व्हॅल्यू फंड योजना, SBI सहित मालामाल करणाऱ्या टॉप SIP योजना सेव्ह करा 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांचं टेन्शन वाढवणारी अपडेट, थेट महागाई भत्ता आणि HRA होणार परिणाम Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Numerology Horoscope | 25 नोव्हेंबर, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल?, तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या

Numerology Horoscope

Numerology Horoscope | अंकशास्त्राच्या गणनेत व्यक्तीचा मूलांक म्हणजे त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज होय. उदा., २३ एप्रिल रोजी एखाद्या व्यक्तीचा जन्म झाल्यास त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज २+३=५ अशी होते. म्हणजेच ५ ला त्या व्यक्तीचा मूलांक असे म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच 11 असेल तर त्याचा मूलांक 1+1= 2 असेल. त्याचबरोबर जन्मतारीख, जन्म महिना व जन्मवर्ष या एकूण योगास भाग्यशाली संख्या असे म्हणतात. उदा., २२.०४.१९९६ रोजी जर कोणाचा जन्म झाला असेल, तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजेच त्याचा लकी नंबर 6 आहे.

मूलांक 1
आज तुमचा दिवस व्यस्त असेल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. सहकाऱ्यांच्या मदतीने कठीण कामेही केली जातील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. कार्यक्षेत्रात नव्या जबाबदाऱ्या सोपविता येतील. कुटुंबात वाद होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो. बिझनेस ट्रीपला जाऊ शकता. हवामानातील बदलाचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो.

मूलांक 2
आज तुमचा दिवस कर्तृत्वाने भरलेला असेल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. नशिबाची साथ मिळेल. नव्या जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपविता येतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. खर्चाचा अतिरेक होईल. स्पर्धेच्या परिस्थितीपासून दूर राहा. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. मुलाच्या बाजूने चांगली बातमी मिळू शकते. अविवाहित व्यक्तींना विवाहाचे प्रस्ताव येतील. आपले आरोग्य सामान्य राहील.

मूलांक 3
आज तुम्ही उत्साहाने भरलेले असाल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. मनात आनंदाची भावना राहील. कार्यक्षेत्रात नव्या जबाबदाऱ्या सोपविता येतील. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. आर्थिक बाबतीत यश मिळेल. जोखमीच्या बाबतीत सावध राहा. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. पोटाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. आहारावर नियंत्रण ठेवा.

मूलांक 4
आज तुमचा दिवस सामान्य असेल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. आर्थिक बाबतीत सावधानता बाळगा. विरोधक सक्रिय होऊ शकतात. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. भावुकतेमुळे महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेऊ नका. धार्मिक कार्यात आपली रुची वाढेल. कुटुंबातील एखाद्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. मानसिक ताण तुम्हाला त्रास देऊ शकतो. वाहन वापरताना सावधानता बाळगावी.

मूलांक 5
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. कार्यक्षेत्रात व व्यवसायात सहकारी व अधिकाऱ्यांशी वाद होऊ शकतो. केलेल्या कामात अडथळे येऊ शकतात. व्यवसायात लाभाच्या संधी कमी मिळतील. धीर धरा. कार्यक्षेत्रातील सहकाऱ्यांच्या मदतीने कठीण कामेही केली जातील. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. जुन्या मित्रांची भेट संभवते. पोटाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. आहारावर नियंत्रण ठेवा.

मूलांक 6
आज आपला दिवस चढ-उतारांनी भरलेला असेल. नोकरी-व्यवसायात सावधानता बाळगा. वाद-विवादांपासून दूर राहा. विरोधकांपासून सावध राहा. बोलण्यावर आणि रागावर नियंत्रण ठेवा. नवीन योजनांवर काम सुरू करण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला नक्की घ्या. कार्यक्षेत्रात नवीन समस्या समोर येऊ शकतात. परिवाराचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. घशाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. वाहन वापरताना सावधानता बाळगावी.

मूलांक 7
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. अधिकाऱ्यांचा सहवास मिळणार . नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. प्रेम संबंधांमध्ये गोडवा राहील. खर्चाचा अतिरेक होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. पोटाचे आजार तुम्हाला त्रास देऊ शकतात. मुलाच्या बाजूने चांगली बातमी मिळू शकते.

मूलांक 8
आज तुमचा दिवस संमिश्र जाईल. कामाच्या ठिकाणी व व्यवसायातील वातावरण आपणास कमी अनुकूल राहील. नव्या योजनांवर काम सुरू करू नका. धोकादायक प्रकरणांतील निर्णय सध्या तरी पुढे ढकला. कार्यक्षेत्रात विरोधक सक्रिय राहू शकतात. वाद-विवादांपासून दूर राहा. व्यवसायात अचानक लाभाच्या संधी मिळतील. भावुकतेमुळे महत्त्वाच्या बाबतीत निर्णय घेऊ नका. आर्थिक बाबतीत आंधळेपणाने कोणावरही विश्वास ठेवू नका. परिवाराचे सहकार्य मिळेल. आपले आरोग्य सामान्य राहील.

मूलांक 9
आज तुमचा दिवस आनंदात जाईल. कार्यक्षेत्रातील व व्यवसायातील वातावरण आपणास अनुकूल राहील. सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. अधिकाऱ्यांचा सहवास मिळणार . नव्या योजनांवर काम सुरू करता येईल. व्यवसायात लाभाच्या संधी मिळतील. व्यवसायाच्या संदर्भात सहलीला जाण्याचा कार्यक्रम होऊ शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. वैवाहिक जीवनात गोडवा राहील. मुलाच्या बाजूने चांगली बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल. आपले आरोग्य सामान्य राहील.

News Title: Numerology Horoscope predictions for these peoples check details 25 November 2022.

हॅशटॅग्स

#Numerology Horoscope(478)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x