9 May 2024 4:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, 1 वर्षात दिला 290% परतावा, कंपनीबाबत आली मोठी अपडेट Spright Agro Share Price | 65 पैशाच्या शेअरची कमाल! अवघ्या 1 वर्षात 5000% परतावा दिला, खरेदीला आजही स्वस्त Gold Rate Today | गुड-न्यूज! आज अक्षय्य तृतीयेच्या 1 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम, पटापट नवे दर तपासून घ्या Wipro Share Price | विप्रो शेअर पुढे तेजीत येणार, कंपनीबाबत सकारात्मक बातमीने गुंतवणूकदारांना फायदा होणार MRPL Share Price | मल्टिबॅगर MRPL शेअर 24 टक्क्याने घसरणार? स्टॉकचार्टने दिले संकेत, तज्ज्ञांनी काय म्हटलं? Railtel Share Price | रेलटेल शेअर ना ओव्हरबॉट, ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी सांगितली पुढची टार्गेट प्राईस Yes Bank Share Price | येस बँक शेअर अल्पावधीत 23% घसरला, तज्ज्ञांनी सांगितली स्टॉक सपोर्ट प्राईस, पुढे नुकसान?
x

Stock To Buy | हे काय? बँक FD मध्ये 5-6 टक्के परतावा, पण या बँकेचे शेअर्स खरेदी केल्यास 55 टक्के परतावा, खरेदी करणार?

Stock To Buy

Stock To Buy | खाजगी क्षेत्रातील बंधन बँकेचे शेअर्स हिरव्या निशाणीवर ट्रेड करताना दिसत आहेत. बंधन बँकेचा स्टॉक कमालीच्या वाढीसह 243 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या स्टॉकमध्ये तेजी येण्याचे कारण म्हणजे प्लुटस वेल्थ मॅनेजमेंट एलएलपीने बंधन बँकेतील 0.55 टक्के भाग भांडवल म्हणजेच 90 लाख शेअर्स 235.65 रुपये किमतीवर खरेदी केले आहेत. या मोठ्या डीलमुळे बंधन बँकेचा स्टॉक हिरव्या निशाणीवर ट्रेड करताना दिसत आहे. ब्रोकरेज हाऊसेस मध्ये या स्टॉक बाबत उत्साहाचे वातावरण आहे. ब्रोकरेज फर्म बंधन बँकेचे शेअर्स उच्च लक्ष किंमतीसह खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. बंधन बँक भौगोलिक आणि उत्पादनाच्या विविधीकरणावर भर देत आहे. बँकेचे ताळेबंद चांगले असून मागील काही काळात विभागनिहाय वाढ पाहायला मिळाली आहे.

ब्रोकरेज हाऊस ICICI सिक्युरिटीजचे मत :
ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने Bandhan Bank च्या स्टॉकवर 365 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. सध्याच्या 236 रुपयांच्या ट्रेडिंग किंमतीनुसार जर हा स्टॉक लक्ष किंमत स्पर्श करतो, तर या स्टॉक मधून 55 टक्के नफा कमाई होऊ शकते. ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की बंधन बँकेचे व्यवस्थापन, पोर्टफोलिओ विविधता, भौगोलिक विस्तार आणि वाढ यावर लक्ष केंद्रित करत आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बंधन बँकेने आर्थिक वर्ष 2022-23 साठी क्रेडिट कास्टमध्ये 1500 कोटी रुपयांचे अतिरिक्त विस्तार लक्ष्य निर्धारित केले आहे.

एकंदरीत पाहता बंधन बँकचे शेअर्स 20-25 टक्क्यांच्या वाढीसह 180 bps च्या std वर क्रेडिट खर्च, 3 टक्के ‘Opex मालमत्ता’ आणि 2.8-3.2 टक्के श्रेणीतील RoAs उपभोगत आहे. वैयक्तिक कर्ज, गहाणखत, किरकोळ मालमत्ता आणि व्यावसायिक बँकिंग बंधन बँकेच्या भविष्यातील वाढीसाठी पोषक ठरू शकते. तथापि, उच्च क्रेडिट खर्च आणि फी उत्पन्नावरील दबाव हे बंधन बँकेसाठी धोकादायक घटक मानले जातात.

ब्रोकरेज फर्म MK ग्लोबलचे मत :
ब्रोकरेज फर्म MK ग्लोबलने bandhan बँकेच्या शेअर्ससाठी 300 रुपये लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. मात्र, तज्ञांनी टार्गेट प्रॉफिट तसेच बँकेच्या महसुलात घट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, MFI नसलेल्या कर्जासाठी पोर्टफोलिओमध्ये संरचनात्मक बदल केल्यास बँकेच्या मार्जिनवर काही प्रमाणात परिणाम होईल. बँकेचे ऑपरेटिंग कॉस्ट देखील चालू आर्थिक वर्षाच्या मध्यावधीत वाढण्याची शक्यता आहे. बंधन ब्रोकरेजने FY23/24/25 या आर्थिक वर्षासाठी कमाईच्या अंदाजात 19टक्के/6टक्के/5टक्के दराने कपात केली आहे, कारण तज्ञांना बँकेच्या क्रेडिट खर्चात वाढ होण्याची भीती आहे. चालू आर्थिक वर्ष 2022-23 ते 2025 मध्ये बंधन बँकेचा RoAs 1.6 टक्के ते 2.6 टक्के पर्यंत राहील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Stock To Buy call on Bandhan Bank Share Price recommended by ICICI Securities check details on 05 December 2022.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x