11 May 2024 7:00 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

Tata Group Stock | टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर हा शेअर जवळपास निम्म्याने स्वस्त झालाय, स्टॉक खरेदी करावा? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या

Tata Group Stock

Tata Group Stock | टाटा उद्योग समूहातील बऱ्याच कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लाल निशाणीवर ट्रेड करत होते. त्यापैकीच एक स्टॉक आहे,”व्होल्टास”. टाटा उद्योग समूहातील Voltas कंपनीचा स्टॉक आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत आहे. व्होल्टास कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवरून निम्म्या किंमतीवर आले आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये Voltas कंपनीचा शेअर 851.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. Voltas कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 803.60 रुपये आहे. स्टॉकची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1347.65 रुपये होती. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Voltas Share Price | Voltas Stock Price | BSE 500575 | NSE VOLTAS)

जर आपण व्होल्टास कंपनीच्या शेअरचे चार्ट पॅटर्न पाहिले तर, आपल्याला समजेल की, Voltas कंपनीचे शेअर्स एका वर्षात 30 टक्क्यांहून जास्त पडले आहेत. तर मागील सहा महिन्यांत Voltas कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 14.57 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील 5 दिवसांत या कंपनीच्या स्टॉकमध्ये 3.50 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. 1 जानेवारी 1999 रोजी व्होल्टास कंपनीचे शेअर्स 13.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. म्हणजेच आतापर्यंत या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 6272 टक्के परतावा कमावून दिला आहे.

व्होल्टास शेअरवर तज्ञांचा सल्ला :
व्होल्टास कंपनीच्या स्टॉकबद्दल तज्ञांच्या भावना संमिश्र आहे. 37 तज्ञापैकी फक्त 4 विश्लेषकांनी Voltas कंपनीचे शेअर्स त्वरित खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 11 तज्ञांनी स्टॉक पडल्यावर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 14 तज्ञांनी स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. तर 6 जणांनी ताबडतोब स्टॉक विकून प्रॉफिट बुक करण्याचा म्हणजेच स्टॉकमधून बाहेर पडण्याचा सल्ला दिला आहे. दोन विश्लेषकांनी स्टॉक मध्ये थोडीफार वाढ झाल्यास विकण्याचा सल्ला दिला आहे.

तिमाही निकाल परिणाम :
2022 या चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत व्होल्टास कंपनीला 6 कोटी रुपयेचा तोटा सहन करावा लागला आहे. त्याचवेळी मागील आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत Voltas कंपनीने 104 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. वार्षिक आधारावर नुकताच संपलेल्या दुसऱ्या तिमाहीत व्होल्टास कंपनीचे उत्पन्न 5.5 टक्क्यांनी वाढले असून कंपनीने 1833 कोटी रुपयेची जबरदस्त कमाई झाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Tata Group Stock of Voltas company share price has fallen and stock price is at lowest level on 08 December 2022.

हॅशटॅग्स

#Tata Group Stock(29)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x