16 May 2024 8:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Andhra Paper Share Price | स्टॉक स्प्लिट आणि आणि डिव्हीडंड वाटपाची घोषणा, अल्पावधीत मजबूत फायदा करून घ्या Praj Industries Share Price | अशी संधी सोडू नका! फटाफट 50% परतावा मिळेल, तज्ज्ञांचा स्टॉक खरेदीचा सल्ला Triveni Turbine Share Price | 97 रुपयाच्या शेअरची कमाल! 3 वर्षात 470% परतावा दिला, शेअर अप्पर सर्किट हिट करतोय RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेल्वे स्टॉक बुलेट ट्रेनच्या वेगाने परतावा देणार HAL Share Price | PSU स्टॉक HAL सुसाट तेजीत परतावा देणार, परतावा पाहून खरेदीला ऑनलाईन गर्दी Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 16 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांकडून टाटा पॉवर शेअर्ससाठी 'बाय' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस केली जाहीर
x

Gold Investment | सोन्यातील गुंतवणुकीसाठी हे 4 पर्याय लोकांना बेस्ट वाटू लागले, गुंतवणुकीतून नफा देखील

Gold Investment

Gold Investment | भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोने वापरणारा देश आहे. सोने हा केवळ एक मौल्यवान धातूच नाही तर भारतातील लोकांसाठी एक शुभ धातू देखील आहे. याशिवाय गुंतवणुकीसाठी सोने हा एक उत्तम पर्याय मानला जातो. लग्नसराईच्या बजेटचा मोठा हिस्सा सोन्याचे दागिने आणि नाणी इत्यादींवर खर्च होतो, यावरूनच भारतातील सोन्याचे महत्त्व लक्षात येते. सोन्यामध्ये गुंतवणुकीचे अनेक पर्याय असू शकतात जसे की दागिने, सोन्याची नाणी, गोल्ड बुलियन इत्यादी. परंतु या सर्वांमध्ये सर्वोत्तम पर्याय म्हणजे सार्वभौम सुवर्ण रोखे मानले जातात.

गोल्ड म्युच्युअल फंड (Gold Mutual Funds)
गोल्ड ईटीएफपेक्षा गोल्ड म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे सोपे आहे. तुम्ही गोल्ड म्युच्युअल फंडात थेट ऑनलाइन पद्धतीने किंवा त्याच्या वितरकांमार्फत गुंतवणूक करू शकता. दुसरीकडे गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुमच्याकडे डिमॅट अकाउंट असणं गरजेचं आहे. गोल्ड म्युच्युअल फंडांमध्ये, एएमसी रिटर्नसाठी गोल्ड ईटीएफमध्ये आपला कॉर्पस गुंतवते. याशिवाय गोल्ड म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याची मुभा देतात. गोल्ड म्युच्युअल फंड हे ओपन एंडेड गुंतवणूक उत्पादन आहे जे गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंडांमध्ये (गोल्ड ईटीएफ) गुंतवणूक करते आणि त्याचे निव्वळ मालमत्ता मूल्य (एनएव्ही) ईटीएफच्या कामगिरीशी जोडलेले आहे.

सॉवरेन गोल्ड बॉण्ड (Sovereign Gold Bond)
या सरकारी योजनेत गुंतवणूक केल्यास जोखीम कमी होते आणि काळजी न करता तुम्हाला परतावा मिळू शकतो. सार्वभौम सुवर्ण रोखे रिझर्व्ह बँकेकडून जारी केले जातात, त्यामुळे त्याच्या शुद्धतेबाबत कोणताही त्रास होत नाही. सॉव्हरेन गोल्ड फंडात गुंतवणूक केल्यास फायदा होतो. सोन्याच्या किंमतीव्यतिरिक्त, वार्षिक 2.5 टक्के निश्चित परतावा देखील मिळतो.

गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंड (Gold ETF)
शेअरप्रमाणे सोने खरेदी करण्याच्या सुविधेला गोल्ड ईटीएफ असे म्हणतात. ही म्युच्युअल फंड योजना आहे. सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी हा सर्वात स्वस्त पर्याय आहे. हे एक्सचेंज ट्रेडेड फंड आहेत जे स्टॉक एक्सचेंजमध्ये खरेदी-विक्री केले जाऊ शकतात. गोल्ड ईटीएफचा बेंचमार्क स्पॉट सोन्याच्या किंमती असल्याने, आपण सोन्याच्या वास्तविक किंमतीच्या जवळपास खरेदी करू शकता. गोल्ड ईटीएफ खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे ट्रेडिंग डिमॅट अकाउंट असणं आवश्यक आहे. यामध्ये युनिटमध्ये सोन्याची खरेदी केली जाते. त्याची विक्री करून तुम्हाला सोने नाही तर त्या वेळच्या बाजारमूल्याएवढी रक्कम मिळते.

पेमेंट अॅपवरून सोनं खरेदी
तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधूनच डिजिटल सोन्यात गुंतवणूक करू शकता. त्यासाठी खूप पैसे खर्च करण्याचीही गरज नाही. तुम्ही तुमच्या सोयीनुसार तुम्हाला हव्या त्या किंमतीत सोनं खरेदी करू शकता. हे फीचर अॅमेझॉन पे, गुगल पे, पेटीएम, फोनपे आणि मोबिक्विक सारख्या प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Investment 4 options check details on 01 January 2023.

हॅशटॅग्स

#Gold Investment(38)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x