28 April 2024 9:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या Sandur Manganese Share Price | अशी संधी सोडू नका! अवघ्या 1 महिन्यात या शेअरने 43% परतावा दिला, खरेदी करणार? Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 28 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mazagon Dock Share Price | सरकारी कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 2 वर्षांत दिला 685% परतावा, पुढची टार्गेट प्राईस? Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार? HUDCO Share Price | PSU शेअर खरेदीला गर्दी, 1 वर्षात 369% परतावा दिला, तर 1 दिवसात 15% परतावा Tata Steel Share Price | टाटा स्टील आणि टाटा मोटर्स शेअर्समध्ये येणार सुसाट तेजी, कंपनीने दिली फायद्याची अपडेट
x

IRB Infra Share Price | 450% परतावा देणारा आयआरबी इन्फ्रा स्टॉक स्प्लिट, 1 शेअरचे 10 तुकडे होणार, स्वस्तात खरेदी करणार?

IRB Infra Share Price

IRB Infra Share Price | IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीच्या संचालक मंडळाने आपले शेअर्स विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर रुपांतर प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 10 शेअर्समध्ये विभाजित करणार आहे. IRB Infra कंपनीने आपले विद्यमान शेअर्स विभाजनासह इक्विटी कॅपिटलमध्ये बदल करण्याचा प्रस्ताव मंजुर केला आहे. या कंपनीने स्टॉक एक्स्चेंज नियामक सेबीला माहिती दिली आहे की, कंपनी शेअर स्प्लिट लागू करण्यासाठी कंपनीच्या विद्यामन शेअर धारकांची मान्यता मिळण्याची वाट पाहत आहे. स्टॉक स्प्लिट बाबत स्पष्टीकरण देताना कंपनीने म्हंटले की, भांडवली बाजारात तरलता वाढवण्यासाठी, भागधारकांचा सहभाग वाढविण्यासाठी आणि लहान गुंतवणूकदारांना शेअर्स परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देण्यासाठी कंपनीने स्टॉक स्प्लिट करण्याचा निर्णय घेतला आहे. IRB इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स कंपनीने 28 फेब्रुवारी 2023 पर्यंत स्टॉक स्प्लिट प्रकिर्य पूर्ण होण्याचा अंदाज वर्तवला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, IRB Infrastructure Developers Share Price | IRB Infrastructure Developers Stock Price | IRB Infra Share Price | IRB Infra Stock Price | BSE 532947)

गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी BSE इंडेक्सवर या कंपनीचा शेअर 1.56 टक्क्यांच्या वाढीसह 319.65 रुपये किमतीवर बंद झाला होता. तर शुक्रवार दिनांक 6 जानेवारी 2023 रोजी IRB Infra कंपनीचा शेअर 1.30 टक्के घसरणीसह 304.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. 2022 मध्ये या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 31 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील तीन वर्षांत स्टॉकची किंमत 55 रुपयेवरून 290 रुपयेवर गेली आहे. या कालावधीत शेअरची किंमत 450 टक्के वाढली आहे.

IRB इन्फ्रा शेअर किंमत इतिहास :
मागील एका महिन्यात या मल्टीबॅगर शेअरची किंमत 276 रुपये वरून 318 प्रति शेअर किमतीवर गेली होती. याकाळात शेअरची किंमत 15 टक्के वाढली आहे. मागील सहा महिन्यांत या स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 63 टक्क्यांचा जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. कोटक सिक्युरिटीज फर्मच्या प्रसिद्ध अहवालानुसार IRB इन्फ्रा कंपनीचा शेअर पुढील 12 महिन्यांत 340 रुपये किंमत पातळी स्पर्श करू शकतो. दीर्घ काळात या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 20 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे.

कोटक सिक्युरिटीज फर्म च्या तज्ञांनी मत व्यक्त केली आहे की, “ IRB infra कंपनी जीआयसी आणि सिंट्रा यांच्याकडून भांडवल उभारणी करून रस्त्यांच्या विकासासाठी एक मोठे व्यासपीठ म्हणून उदयास आले आहे. यामध्ये टोल प्रकल्पांचा पोर्टफोलिओ, बांधकाम शाखा आणि नवीन प्रकल्पांना वित्तपुरवठा करण्यासाठी विकास भांडवल यांचा समावेश करण्यात आला आहे. आयआरबीच्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे टोल संकलनात वाढ होत आहे. ब्रोकरेज फर्मने म्हंटले आहे की, NHAI कडून भांडवल पुरवठा कमी असून देखील IRB Infra ची EPC शाखा मजबूत ऑर्डर बुकसह आपल्या स्पर्धक कंपनीच्या तुलनेत चांगल्या स्थितीत आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IRB Infra Share Price 532947 in focus check details on 06 January 2023.

हॅशटॅग्स

stock split(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x