11 May 2024 7:15 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

PNGS Gargi Fashion Jewellery Share Price | 30 रुपयांच्या शेअरने अल्पावधीत 311% परतावा दिला, हा स्टॉक पुढे पैसा ओतणार?

PNGS Gargi Fashion Jewellery Share Price

PNGS Gargi Fashion Jewellery Share Price | पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीचा आयपीओ जेव्हापासून शेअर बाजारात लिस्ट झाला आहे, तेव्हापासून त्याने अक्षरशः बाजारात धुमाकुळ घातला आहे. या कंपनीचा IPO 8 डिसेंबर 2022 रोजी गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता, आणि 13 डिसेंबर रोजी त्याची मुदत पूर्ण झाली होती. पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची किंमत 30 रुपये निश्चित केली होती. या कंपनीचे शेअर्स 20 डिसेंबर 2022 रोजी स्टॉक एक्स्चेंजवर 57 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. लिस्टिंगच्या दिवशी शेअरची किंमत 5 टक्के अप्पर सर्किटसह 59.85 रुपये किमतीवर पोहचली होती. स्टॉक लिस्टींग झाल्यापासून या कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, PNGS Gargi Fashion Jewellery Share Price | PNGS Gargi Fashion Jewellery Stock Price | BSE 543709)

अल्पावधीत 311 टक्के परतावा :
पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 311 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या IPO मध्ये शेअर्सची इश्यू किंमत 30 रुपये निश्चित करण्यात आली होती. पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीचा शेअर गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 10 टक्के अप्पर सर्किटवर लागून 123.20 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. शुक्रवार दिनांक 6 जानेवारी 2023 रोजी हा स्टॉक 0.13 टक्के घसरणींसह 77.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. 20 डिसेंबर 2022 रोजी हा स्टॉक सूचीबद्ध झाला होता. गुरुवार दिनांक 5 जानेवारी 2023 रोजी 123.20 रुपये आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर क्लोज झाले होते.

लिस्टिंगनंतर 106 टक्के परतावा :
पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीचा बाजार भांडवल 118.62 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 248.68 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आलेला कोटा 213.21 पट अधिक सबस्क्राइब झाला होता. पीएनजीएस गार्गी फॅशन ज्वेलरी कंपनीचा IPO एकूण 230.94 पट अधिक सबस्क्राइब झाला होता, आणि या कंपनीने IPO चा आकार 7.80 कोटी रुपये निश्चित केला होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PNGS Gargi Fashion Jewellery Share Price 543709 check details on 06 January 2023.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x