9 May 2024 5:02 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 09 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे गुरुवारचे राशिभविष्य | 09 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा गुरुवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा?
x

Sigachi Industries Share Price | बाब्बो! एक बातमी आली आणि या शेअरने 1 दिवसात 20% परतावा दिला, स्टॉक खरेदी करणार?

Sigachi Industries Share Price

Sigachi Industries Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सिगाची इंडस्ट्रीज या फार्मा कंपनीच्या शेअर्सनी 19 टक्क्यांची उसळी घेतली होती. किंबहुना कंपनीने इक्विटी किंवा परिवर्तनीय वॉरंटद्वारे खुल्या बाजारातून भांडवल उभारण्यासाठी संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेतल्यानंतर कंपनीच्या शेअर्सनी उसळी घेतली, आणि शेअर्समध्ये 20 टक्के अप्पर सर्किट लागला होता. सिगाची इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स जबरदस्त तेजीत आले आहेत. सिगाची इंडस्ट्रीज कंपनीचा शेअर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 19.70 टक्क्यांच्या वाढीसह 329.35 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Sigachi Industries Share Price | Sigachi Industries Stock Price | BSE 543389 | NSE SIGACHI)

संचालक मंडळाची बैठक आणि निर्णय :
सिगाची इंडस्ट्रीज कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक मंगळवार दिनांक 10 जानेवारी 2023 रोजी आयोजित करण्यात आली आहे. या कंपनीने आपल्या स्टॉक मार्केट नियामक फाइलिंगमध्ये माहिती दिली आहे की,’ कंपनीने भांडवल उभारणी करण्यासाठी प्रवर्तक आणि गैर-प्रवर्तकांना प्राधान्य देण्याच्या आधारावर इक्विटी किंवा परिवर्तनीय वॉरंट जारी करण्याचा विचार केला आहे. आणि या प्रस्तावावर विचार करण्यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सिगाची इंडस्ट्रीज कंपनीचे बाजार भांडवल 1012.5 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 411 रुपये होती. त्याच वेळी सिगाची इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 231.30 रुपये होती.

15 नोव्हेंबर 2021 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध
सिगाची इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स 15 नोव्हेंबर 2021 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध करण्यात आले होते. सूचीबद्ध झाल्यानंतर या कंपनीच्या शेअरनी कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सर्वाधिक एक-दिवसीय वाढ नोंदवली आहे. या कंपनीच्या शेअर्सनी 231.30 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 40 टक्के वाढीसह ट्रेड करत आहे. सिगाची इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या आयपीओ शेअरची किंमत 163 रुपये निश्चित केली होती. या कंपनीने आपल्या IPO द्वारे 125 कोटी रुपये भांडवल खुल्या बाजारातून जमा केले होते. पुढे केअर रेटिंग्स फर्मने गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कंपनीचा -A रेटिंग कायम ठेवला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sigachi Industries Share Price 543389 SIGACHI in focus check details on 07 January 2023.

हॅशटॅग्स

Quick Money Share(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x