8 May 2024 3:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
South Indian Bank Share Price | शेअर प्राईस 27 रुपये! स्टॉकमध्ये मजबूत ब्रेकआउट, लवकरच मोठा परतावा देईल Gold Rate Today | खुशखबर! आज अक्षय्य तृतीयेच्या 2 दिवस आधी सोन्याचा भाव धडाम झाला, नवे दर तपासून घ्या Sterling and Wilson Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपचा हिस्सा! 1 महिन्यात दिला 41% परतावा, स्टॉक अप्पर सर्किटवर JP Associates Share Price | शेअर प्राईस रु.17, जेपी असोसिएट्स कंपनीबाबत चिंता वाढवणारी अपडेट, स्टॉक Sell करावा? Yes Bank Share Price | येस बँकेबाबत नवीन अपडेट आली, थेट शेअर्सला किती फायदा होणार? स्टॉक Buy करावा? IRFC Vs IREDA Share Price | PSU शेअर्स तुफान तेजीत धावणार? IRFC आणि IREDA स्टॉकची जोरदार खरेदी सुरु GTL Share Price | स्वस्त GTL शेअर रॉकेट तेजीने धावणार, कंपनीकडून सकारात्मक बातमी आली, किती फायदा?
x

Raghav Productivity Enhancers Share Price | 28 रुपयाच्या शेअरने 1000% परतावा दिला, दिग्गजांनी खरेदी केला स्टॉक, फायदा घेणार?

Raghav Productivity Enhancers Share Price

Raghav Productivity Enhancers Share Price | राघव प्रोडक्टिव्हिटी एन्हांसर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी मागील काही महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सनी स्वतःला मल्टीबॅगर स्टॉक म्हणून सिद्ध केले आहे. मात्र मागील काही ट्रेडिंग सेशनपासून या कंपनीच्या शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या तिमाहीमध्ये राघव प्रोडक्टिविटी एन्हांसर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरहोल्डिंग देतात पॅटर्ननुसार कंपनीच्या वैयक्तिक भागधारकांच्या यादीमध्ये आशिष कचोलिया आणि मुकुल अग्रवाल या दिग्गज गुंतवणूकदारांचे नाव सामील झाले आहे. याचा अर्थ आशिष कचोलिया आणि मुकुल अग्रवाल यांच्या पोर्टफोलिओमध्ये राघव प्रोडक्टिव्हिटी एन्हांसर्स लिमिटेड कंपनीचे शेअर सामील झाले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Raghav Productivity Enhancers Share Price | Raghav Productivity Enhancers Stock Price | BSE 539837)

आशिष कचोलिया पोर्टफोलिओ :
आशिष कचोलिया यांच्याकडे राघव प्रोडक्टिव्हिटी एन्हांसर्स लिमिटेड कंपनीचे 1 टक्के भाग भांडवल आहे. राघव प्रोडक्टिव्हिटी एन्हांसर्स लिमिटेड कंपनीच्या शेअरहोल्डिंग डेटा पॅटर्ननुसार Q3 FY2023 मधे आशिष कचोलिया यांच्याकडे राघव प्रोडक्टिव्हिटी एन्हांसर्स लिमिटेड कंपनीचे 2,31,683 शेअर्स आहेत. जे कंपनीच्या एकूण पेड-अप कॅपिटलच्या 2.13 टक्के आहे. जुलै ते सप्टेंबर 2022 या तिमाहीतील जाहीर शेअरडेटा लिस्टमधे आशिष कचोलिया यांचे नाव सामील नव्हते. याचा भारतीय शेअर बाजारात ‘बिग व्हेल’ म्हणून प्रसिद्ध आशिष काचोलिया यांनी ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 याकालावधीत कंपनीचे नवीन शेअर्स खरेदी केले होते.

मुकुल अग्रवाल पोर्टफोलिओ :
आर्थिक वर्ष FY23 च्या Q3 तिमाहीत राघव प्रोडक्टिविटी एन्हांसर्स लिमिटेड कंपनीच्या शेअर होल्डिंग डेटापॅटर्न लिस्टमध्ये दिग्गज गुंतवणुकदार मुकुल अग्रवाल यांचे नाव सामील नव्हते. डिसेंबर 2022 पर्यंत या कंपनीच्या शेअरहोल्डिंग डेटा पॅटर्ननुसार मुकुल अग्रवाल यांच्याकडे राघव प्रोडक्टिविटी एन्हांसर्स लिमिटेड कंपनीचे 1,78,074 शेअर्स आहेत. जे एकूण भाग भांडवलाच्या 1.64 टक्के आहे.

शेअर्स किंमतीचा इतिहास :
मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या शेअर धारकांना 75 टक्के परतावा कमवून दिला आहे. कोविड नंतरच्या रॅलीमध्ये मागील तीन वर्षांत या स्मॉल कॅप स्टॉक कंपनीचे शेअर्स 80 रुपयेवरून वाढून 915 रुपयेपर्यंत पोहचले आहेत. मागील तीन वर्षांत या कंपनीच्या शेअर्सनी आपल्या भागधारकांना 1000 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांत या स्मॉल कॅप मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या शेअर धारकांना 800 टक्क्यांहून अधिक परतावा कमवून दिला आहे. 13 एप्रिल 2016 ते 5 जानेवारी 2023 पर्यंत या मल्टीबॅगर स्मॉल कॅप स्टॉकची किंमत 28.61 रुपये वरून 915 रुपये पर्यंत वाढली आहे. दीर्घकालीन गुंतवणूकदारांनी या स्टॉकमधून 3000 टक्क्यांचा बंपर परतावा कमावला आहे. मिळाला आहे. ज्या लोकांनी या स्टॉकमध्ये एक लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणूकीचे मूल्य आता 32 लाख रुपये झाले आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Raghav Productivity Enhancers Share Price 539837 in focus check details on 07 January 2023.

हॅशटॅग्स

#Multibagger Stock(577)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x