26 April 2024 11:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 27 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Multibagger Stocks | व्होडाफोन आयडिया शेअरसहित हे 2 शेअर्स देतील मल्टिबॅगर परतावा, तज्ज्ञांनी काय म्हटले? NMDC Share Price | सुवर्ण संधी! हा शेअर श्रीमंत करेल, अल्पवधीत देईल 140 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TAC Infosec Share Price | आयुष्य बदलणारा शेअर! अवघ्या 20 दिवसात दिला 400% परतावा, खरेदी करणार? Indian Hotel Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा ग्रुपचा मल्टिबॅगर शेअर मोठा परतावा देईल, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

यांचं सगळंच अवघड झालं राव! अशोक चव्हाणही राजीनाम्याच्या तयारीत?

Congress, Ashok Chavan

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यावरून काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. खुद्द काँग्रेसनेतेअशोक चव्हाण यांनीच आपण प्रदेशाअध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याचे कार्यकर्त्याशी बोलताना म्हटले. या संदर्भातील एक ऑडियो क्लीप सध्या व्हायरल झाली असून त्यात ते राजीनामा देण्याच्या तयारीत सांगत आहेत.

चंद्रपूरमध्ये शिवसेनेचे आमदार बाळू धानोरकर यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यासाठी अशोक चव्हाण इच्छूक होते. मात्र काँग्रेसकडून विनायक बांगड यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वास्तविक पाहता चव्हाण यांच्या सांगण्यावरूनच आमदार धानोरकर यांनी आमदारकीचा राजीनामा देत शिवसेनेला जय महाराष्ट्र केले होते.

मात्र त्यांनाच मी लोकसभेची उमेदवारी देऊ शकलो नाही. माझे कुणीच ऐकत नाही. त्यामुळे मलाच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्यावासा वाटतो, अशी भावना चव्हाण यांनी क्लिपमध्ये व्यक्ती केली आहे. या क्लिपमुळे काँग्रेसमधील अंतर्गत कलह आता समोर आले आहे. हे कलह ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससाठी अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x