6 May 2024 4:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Captain Pipes Share Price | काय चाललंय काय? या शेअरने 1 वर्षात 900% परतावा, 3 दिवसात 30%, आज 10% वाढला

Captain Pipes Share Price

Captain Pipes Share Price | भारतीय शेअर बाजारात ब्लू चीप कंपनीचे शेअर्स कमजोर झाले आहेत, तर एसएमई कंपन्यांच्या शेअर्समध्ये मजबूत वाढ पाहायला मिळत आहे. ‘कॅप्टन पाईप्स’ कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. सलग तीन दिवस स्टॉकमध्ये 10 टक्के अप्पर सर्किट लागला आहे. 13 जानेवारी 2023 रोजी ‘कॅप्टन पाईप्स’ कंपनीचे शेअर्स 10 टक्के अप्पर सर्किटवर 550 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ‘कॅप्टन पाईप्स’ कंपनीच्या शेअरची उच्चांक किंमत पातळी 602 रुपये होती. म्हणजेच ज्या गुंतवणूकदाराने 3 दिवसापूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे लावले असते तर, आज त्यांना 30 टक्के नफा झाला असता. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Captain Pipes Share Price | Captain Pipes Stock Price | BSE 538817)

13 डिसेंबर 2022 रोजी ‘कॅप्टन पाईप्स’ कंपनीचे शेअर्स 300 रुपयांवर ट्रेड करत होते. मात्र सध्या या कंपनीचे शेअर्स 550 रुपये वर पोहोचले आहेत. मागील 15 दिवसांत या SME कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 100 टक्के परतावा कमावून दिला आहे. 10 जानेवारी 2023 रोजी या कंपनीने शेअर बाजार नियामक सेबीला सादर केलेल्या कागदपत्रात म्हंटले आहे की, कंपनीच्या संचालक मंडळाने 27 जानेवारी 2023 ला 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे.

मागील तीन वर्षातील परतावा :
3 फेब्रुवारी 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 58.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता मात्र शेअरने 550 रुपये किंमत स्पर्श केली आहे. अवघ्या एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 900 टक्क्यांहून जास्त नफा मिळवून दिला आहे. मागील 6 महिन्यात गुंतवणूकदारांनी मजबूत कमाई केली आहे. गेल्या सहा महिन्यात कॅप्टन पाईप्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 450 टक्क्यांपेक्षा अधिक परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 602 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 57.50 रुपये होती. कंपनीचे बाजार भांडवल 279.84 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Captain Pipes Share Price 538817 in focus check details on 13 January 2023.

हॅशटॅग्स

Quick Money Share(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x